हार्बर मार्ग, ट्रान्सहार्बर ठरतोय 'घातक'; वाचा का 'ते'... 
मुंबई

हार्बर, ट्रान्सहार्बर मार्ग ठरतोय 'घातक'; वाचा का 'ते'...

शरद वागदरे

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावर पनवेल व वाशी लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत गतवर्षी सन 2019 मधील वर्षभरात घडलेल्या अपघातांमध्ये 247 प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करताना झाले. रेल्वे रूळ ओलांडण्यावर प्रतिबंध असतानाही लवकर पोहोचण्याच्या प्रयत्नात प्रवाशांकडून जीव मुठीत धरून रूळ ओलांडले जात आहेत. सन 2018 मध्ये 251 जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. त्या तुलनेत या वर्षी रेल्वे अपघात चारने घट झाली आहे. 

नवी मुंबईत ट्रान्स हार्बर तसेच हार्बर रेल्वे मार्गाभोवती सुरक्षा भिंत बांधण्याचा प्रश्‍न मागील अनेक वर्षांपासून रेंगाळलेला आहे. जागोजागी रेल्वेरूळ ओलांडण्याचे शॉर्टकट तयार झाले आहेत. स्थानकाचा प्रवेशद्वार मार्ग न वापरता थेट फलाटावर ये-जा करण्यासाठी अथवा रुळाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी जीव धोक्‍यात घातला जात आहे. अशा ठिकाणावरून रेल्वे प्रवाशांकडून दिवस-रात्र रूळ ओलांडले जात आहेत. अशा वेळी वेगवान रेल्वेची धडक लागून प्रवासी मरण पावण्याचे अथवा जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत. 

त्यानुसार सन 2019 मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत वाशी व पनवेल रेल्वे पोलिसांच्या हद्दीत एकूण 247 रेल्वे प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यापैकी 78 प्राणांतिक अपघात पनवेल रेल्वे पोलिसांच्या हद्दीत बेलापूर ते पनवेल व पनवेल ते कळंबोलीदरम्यान घडले आहेत; तर उर्वरित 169 मृत्यू हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे पोलिसांच्या हद्दीत सीवूडस्‌ ते गोवंडी व वाशी ते ऐरोलीदरम्यान घडले आहेत. वाशी व पनवेल रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षांत 498 जणांना रेल्वे अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

रेल्वे प्रवाशांकडून जीव धोक्‍यात घालून रूळ ओलांडले जाऊ नयेत यासाठी जनजागृती करण्यात येते. तरीदेखील रेल्वे प्रवशांकडून घाईत जाण्याच्या नादात रेल्वे रूळ ओलांडले जात आहेत. रेल्वे वेळ ओलांडताना भेटल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. 
- नंदकिशोर सस्ते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाशी (रेल्वे). 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: चक दे इंडिया! भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; हॉकीचं सुवर्णपदक आता एक विजय दूर...

Hingoli Court : चोर कोर्टात तारखेसाठी आले अन् इन्व्हर्टर, बॅटरीच पळवली; हिंगोलीत चोरट्यांचा प्रताप, काय आहे प्रकरण?

Ration Card: 'त्या' शिधापत्रिका निष्क्रिय होणार, सहा महिने धान्याची उचल नसल्यास सरकार घेणार मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : 'काळजी करु नका, न्याय मिळवून देऊ'; उद्धव ठाकरेंकडून प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांना ग्वाही

Shrigonda News: विवाहितेसह २२ वर्षीय तरुणाने एकत्रच संपवलं आयुष्य; नगरमधील घटनेनं खळबळ; पोलीस तपास सुरू

SCROLL FOR NEXT