मुंबई

मुंबईत एकाच हॉस्पिटलमधील २६ नर्स आणि ३ डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालय परिसर केला सिल

सकाळवृत्तसेवा

मुंबई :  मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा तब्बल ७५० पार पोहचला आहे. मात्र आता रुग्णांसाठी झटणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे.

मुंबईच्या वोक्हार्ट रुग्णालयातल्या तब्बल २६ नर्स आणि ३ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे मुंबई महापालिकेतर्फे वोक्हार्ट रुग्णालय आणि आजूबाजूचा परिसर हा ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल या भागात हे रुग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णालयातून कोणीही आतून बाहेर जाऊ शकणार नाहीये. तसंच कोणीही बाहेरुन रुग्णालयातमध्ये  जाऊ शकणार नाहीये. जोपर्यंत या रुग्णालयातल्या सर्व रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत हा परिसर ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

या रुग्णालयात काम करणाऱ्या २७० नर्स, डॉक्टर आणि काही रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. यापैकी ज्यांचा  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्या सगळ्यांना विलगीकरण कक्षात ठेवलं जाणार आहे. एका रुग्णामुळे या हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली अशी मिळतेय.

वोक्हार्ट रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक रुग्ण दाखल झाला होता. या रुग्णाच्या छातीत काही त्रास होत असल्यामुळे त्याला भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण चार दिवस रुग्णालयात होता. या रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे या सर्वांना कोरोनाची लागण झाली असावी अशी शक्यता वर्तवली जातेय.

दरम्यान यामुळे आपल्याला सर्वांनाच सजग आणि जागरूक राहण्याची गरज आहे.

26 nurses and 3 doctors detected positive in one of the reputed hospitals of mumbai 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT