बोरिवलीत रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक; महिन्यात आढळले 4 हजार 982 रुग्ण 
मुंबई

बोरिवलीत रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक; महिन्यात आढळले 4 हजार 982 रुग्ण

समीर सुर्वे

मुंबई, ता. 3 : बोरीवली "आर मध्य' प्रभागात सप्टेंबर महिन्यात 4 हजार 982 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. ही शहरातील सर्वाधिक वाढ आहे. तर, अंधेरी जोगेश्‍वरी पुर्व "के पुर्व' प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी महिन्या भरात 105 दिवसांवरुन 66 दिवसांपर्यंत खाली आला आहे.

बोरीवली प्रभागात कोविड रुग्णवाढीचा वेग गेल्या दोन महिन्यांपासून सर्वाधिक आहे. रुग्णवाढीचा वेग 1.49 टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 47 दिवसांचा आहे. त्या खालोखाल अंधेरी, जोगेश्‍वरी पश्‍चिम के पश्‍चिम प्रभागात रुग्ण वाढले आहेत. सप्टेंबर महिन्यात या प्रभागात 4 हजार 343 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.या प्रभागातील रुग्णवाढीचा दर 1.30 टक्के आहे. तर, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 54 दिवसांचा आहे.

के पुर्व प्रभागात गेल्या महिन्याभरात 3 हजार 328 नवे रुग्ण नोंदविण्यात आले. या प्रभागात 1 सप्टेंबर रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 105 दिवसांचा होता. तर रुग्ण वाढीचा दर 0.66 टक्के होता. 1 ऑक्‍टोबरपर्यंत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 66 दिवसांवर खाली आहे. तर, रुग्णवाढीचा दरही 1.06 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे.


कांदिवली आर दक्षिण प्रभागात गेल्या महिन्याभरात 3 हजार 718 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मालाड पी उत्तर प्रभागात गेल्या महिन्याभरात 3 हजार 490 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ग्रॅन्टरोड, मलबारहिल, ताडदेव डी प्रभागात 3 हजार 718 नवे रुग्ण आढळले आहेत. वांद्रे, खार पश्‍चिम एच पश्‍चिम प्रभागात 2 हजार 426 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या प्रभागात आतापर्यंत 6 हजार 662 रुग्णांची नोंद झाली आहे.

पहिल्या पाच प्रभागातील रुग्ण संख्या
प्रभाग - 1 ऑक्‍टोबर - 1 सप्टेंबर
आर मध्य - 13386 - 8404
के पश्‍चिम - 12589 - 8246
पी उत्तर - 12278- 8786
के पुर्व - 12146 - 8818
आर दक्षिण - 11042- 7324

(संपादन - अनिल जमधडे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM M. K. Stalin : 'मतदार यादीतून नाव वगळणे दहशतवादापेक्षाही गंभीर आणि भयानक'; मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या इशाऱ्याचा काय अर्थ?

Fake Marriage Racket in Dharashiv: खोटा विवाह लावून देत तरुणाचे सव्वा लाख लाटले; नवरीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

Asia Cup 2025: शुभमन गिल आशिया चषक खेळणार का? ब्लड रिपोर्ट समोर आला, सध्या तो कुठेय?

Latest Marathi News Updates : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; गावांचा संपर्क तुटला, शेती पाण्याखाली

Ahilyanagar News: 'नगरमध्ये युवा साहित्य व नाट्य संमेलन'; मसापच्या सावेडी शाखेला यजमानपदाचा बहुमान

SCROLL FOR NEXT