मुंबई

तब्बल 425 वर्षाची परंपरा होणार खंडीत! विदर्भातून पंढरपूरला जाणाऱ्या रुक्मिणी माऊलीच्या पालखीला परवानगी नाही

सकाळ वृत्तसेवा


मुंबई ; गेल्या 425 वर्षापासून रुख्मिणी मातेचे माहेरघर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूर येथून आषाढी एकादशीला पंढरपूरला पालखी जाते. महाराष्ट्रातील जुन्या परंपरांपैकी ही एक आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ 5 पालख्यांना परवानगी दिली आहे. यामध्ये रुक्मीनी पालखीचा समावेश नाही. त्यामुळे 425 वर्षाची पालखीची पंरपरा यावेळी पहिल्यांदा खंडीत होणार आहे. त्यामुळे वारकरी नाराज आहेत.

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन पंढरपूर येथे मानाच्या ५ पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. रुख्मिणी मातेच्या माहेरहुन दरवर्षी साडीचोळी, नैवद्य चढविण्यात येतो .मात्र यावर्षी विदर्भातील पालख्यांना परवानगी नसल्याने  विठ्ठल रुख्मिणी संस्थानाने नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भातील या सर्वात जुन्या पालखीला विशेष परवानगी देण्याची विठ्ठल रुख्मिणी संस्थानाने प्रशासनाने मागणी केली आहे. 26 मेला पालखीची विधीवत पूजा केली आहे. आता पालखीचे प्रस्थान होण्यासाठी वाट पाहत असल्याचे संस्थान सदस्यांनी म्हटले आहे.

परवानगी दिल्यास सोशल डिस्टसिंगच्या नियमांचं पालन करून आम्ही पालखी काढण्यात काढू असं विश्वस्तांनी सांगितल आहे. यासंदर्भात सोलापूर जिल्हाचे पालकमंत्र्यांशी या संदर्भात बोलणी सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आषाढी एकादशीसाठी दरवर्षी विदर्भातून अनेक पालख्या पंढरपूर रवाना होतात. मात्र यावेळी एकाही पालखीला परवानगी देण्यात आली नाही. 

यावेळी मानाच्या 5 पालखीमध्ये विदर्भातील एकाही पालखीचा समावेश या वेळी केला नाही.  हा विदर्भावरचा अन्याय आहे. विदर्भातील पाच पालख्यांना, 25 वारकऱ्यासह प्रवासाला मंजूरी द्यावी. अन्यथा आमच्या वाहनाने आम्ही पंढरपूरला जाऊ. 
गणेश शेटे 
विश्वस्त वारकरी, कौड्यनपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

Tukaram Mundhe Water Inspection : तुकाराम मुंढेंना आता वेगळं काम; हॉटेलमध्ये मिळणारे जारमधील पाणी तपासणार, एसओपी तयार करण्याचे निर्देश

Marathi Live Updates : मुसळधार पावसाने अंबा नदीचा जोडरस्ता जलमय, राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची बातमी समजताच सर्वात आधी कोणाला फोन केला? स्वतःच केला खुलासा

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार, तरी पाण्याची चिंता कायम! ७ धरणांच्या साठ्यात फक्त ३ टक्के वाढ, आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT