pilot. 
मुंबई

अरे बापरे..! चीनला गेलेल्या एअर इंडियाच्या पाच पायलटना कोरोना

वृत्तसंस्था

मुंबई : एकीकडे जगभरात कोरोनाची साथ वेगाने फैलावत असतानाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहे. मात्र सुरक्षेची खबरदारी घेतल्यावरही त्यांना कोरोनाची लागण होण्याच्या अनेक बातम्या समोर येत आहे. अशाच प्रकारे चीनला कार्गो विमान घेऊन गेलेल्या एअर इंडियाच्या पाच पायलटना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. हे सर्व पायलट गुआंगझाओला गेलेल्या विमानावर नियुक्त केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून एअर इंडिया विविध देशात कार्गो उड्डाणे करीत आहेत. त्यापैकीच एक विमान गुआंगझाओ येथे वैद्यकीय साहित्य आणण्यासाठी 18 एप्रिलला येथे गेले होते. एअर इंडियाची कार्गो विमाने शांघाय तसेच हाँगकाँगलाही जात आहेत. याबाबत एअर इंडियाने अजून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.  पाच पायलट्सना कोरोना झाल्याची बातमी समजल्यापासून काही पायलटना आपली चिंता वाटत आहे. 'वंदे भारत' मिशन अंतर्गत अनेक विमाने परदेशात जात आहेत. कोरोना रुग्णांचे प्रमाण असलेल्या न्यूयॉर्कलाही जावे लागत आहेत. तिथे त्यांना ब्रेक घ्यावा लागत आहे, याकडेही काहींनी लक्ष वेधले. 

'वंदे भारत मिशन'अंतर्गत सेवा करीत असलेल्या विमान कर्मचाऱ्यांची प्रवास सुरु करण्यापूर्वी तसेच प्रवास करण्यापूर्वी चाचणी होते. प्रवासानंतर त्यांना थेट हॉटेलमध्ये नेण्यात येते. अहवाल येईपर्यंत त्यांची व्यवस्था हॉटेलमध्येच होते. चाचणी निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी नेण्यात येते; पण कोणाबरोबरही संपर्क न ठेवण्याची सूचना असते. पाच दिवसांनी पुन्हा चाचणी होते. ती निगेटीव्ह आली तसेच कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्यास ते कामावर रुजू होतात. कामावरील कोरोना चाचणी पाच दिवस अगोदर होत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price India : देशात नव्याने पेट्रोल-डिझेल दर जाहीर; कुठे स्वस्त, महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! जायकवाडी धरण ८० टक्के क्षमतेच्या उंबरठ्यावर; धरणात पाण्याची जोरदार आवक

MHADA: स्वप्नाच्या शहरात स्वत:चं घर! म्हाडाच्या घरांची लवकरच लॉटरी निघणार, विकसकांकडून ५,५०० घरे मिळणार; तयारी सुरू

Peru Plane Crash : पेरूमध्ये पर्यटकांचे विमान कोसळले, १३ जणांचा मृत्यू; नाझ्का लाइन्स पाहताना काळाने गाठले

Mumbai News: मुंबईवर आता सीसीटीव्हीची नजर, उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांना दणका; महापालिकेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT