Hotel-Hyatt-Regency 
मुंबई

Lockdown Effect: मुंबईतील 5-स्टार 'हयात रिजन्सी' हॉटेल बंद

आर्थिक चणचण, कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासही व्यवस्थापन हतबल

विनोद राऊत
  • आर्थिक चणचण, कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासही व्यवस्थापन हतबल

मुंबई: दोन महिन्यानंतर मुंबईसह राज्य अनलॉक झाले. दीर्घ कालावधीनंतर सुरु होत असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट्समुळे व्यवसायिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. पण दुसरीकडे मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाजवळच्या हयात रिजन्सी या पंचताराकीत हॉटेलचे दरवाजे ग्राहकांसाठी बंद करण्यात आले. सोमवारी हॉटेल व्यवस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्यांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी कंपनीकडे पैसै नाही, त्यामुळे नाईलाजाने हॉटेल सेवा काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. "हयात रिजन्सीसारख्या 5 स्टार हॉटेलला सेवा सुरु ठेवणे झेपत नाही, यावरुन देशात सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारे हॉटेल आणि आदरातिथ्य क्षेत्र लॉकडाऊनमुळे किती अडचणीत आले आहे, याचा अंदाज बांधता येतो. ही केवळ सुरुवात आहे. येणाऱ्या काळात अनेक हॉटेल बंद पडतील", असा इशारा या क्षेत्रातील जाणकार प्रदिप शेट्टी यांनी दिला.

सोमवारचा दिवस मुंबईतील प्रसिध्द हयात रिजन्सीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अंत्यत वाईट दिवस ठरला. हॉटेलचे मुख्य व्यवस्थापक हरदिप मारवा यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ई-मेल लिहून, हॉटेल सुरु ठेवण्यासाठी पैसै नसल्यामुळे हॉटेल बंद ठेवणार असल्याचा निर्णय कळवला. मुंबईतल्या हयात रिजन्सीची मालकी एशियन हॉटेल (पश्चिम) या कंपनीकडे आहे. इंडिया हयातचे उपाध्यक्ष सुजय शर्मा यांनी सांगितले, सध्या कंपनी अडचणीत असून सेवा सुरु ठेवणे कठीण असल्यामुळे पुढच्या सुचनेपर्यंत हॉटेल बंद असणार आहे.

सध्या हयात मध्ये थांबलेल्या पाहुण्यांची व्यवस्था कशी करता येईल त्याबद्दल व्यवस्थापनासोबत बोलणे सुरु आहे. त्यामुळे हयात हॉटेल्सची मध्यवर्ती बुकिंग सेवादेखील काही काळासाठी स्थगित ठेवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दिल्लीच्या जे डब्लू मॅरीयेट्स या प्रसिध्द हॉटेलची मालकीदेखील एशियन हॉटेल्सच्या उपकंपनीकडे आहे. फेब्रुवारी महिन्यातच या कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकाने राजीनामा दिला होता.

कंपनी डबघाईला

मुंबई हयात रिजन्सीची मालक असलेली एशियन हॉटेल्स (वेस्ट) ही कंपनी डबघाईला आली आहे. 2019-20 च्या वार्षिक अहवालात कंपनीला 218.46 कोटींचा तोटा झाल्याचे सांगण्यात आले. या वर्षात कंपनीचे उत्पन्न 143 कोटी होते, तर 2018-19 मध्ये कंपनीचे उत्पन्न 159 कोटी होते. दोन वर्षात कंपनीचा फायदा 16 कोटींवरुन अडीच कोटींवर आला आहे.

गेल्या वर्षापासून लॉकडाऊनमुळे हॉटेलचा व्यवसाय शून्य आहे. आंतराष्ट्रीय प्रवास बंद आहे, देशाअंतर्गत पर्यटन बंद आहेत. कॉर्पोरेट बैठका होत नाही. हयातमध्ये काय झाले मला माहिती नाही, मात्र हा कोरोनाचा धक्का आहे, हे निश्चित आहे. जितके मोठे हॉटेल, तेवढा पसारा, खर्च जास्त असतो. गेल्या मार्चपासून हॉटेल मालकांना केवळ नुकसान सहन कराव लागतय, बाहेरुन पैसा टाकावा लागतोय. केंद्र आणि राज्यांनी हॉटेल क्षेत्राला कुठलीही मदत दिली नाही. त्यामुळे हे क्षेत्र संकटात आले आहे.

-प्रदीप शेट्टी, प्रवक्ते, हॉटेल अँड रेस्टारेंट असोसिएशन वेस्टर्न इंडिया (HRAWI)

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey Trap Miraj : बुलाती है मगर जानेका नहीं! सोशल मीडियाचा नाद लावून पोरं बाद करणारी टोळी, मिरजेत फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; कोल्हापूर कनेक्शन

Jalna Crime: पोलिस रेकॉर्डवरील एकाचा खून; जालन्यात थरार, जमिनीच्या वादातून चौघांकडून सशस्त्र हल्ला

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

SCROLL FOR NEXT