mumbai police 
मुंबई

धक्कादायक! मुंबईत 53 वर्षीय पोलिसाचा कोरोनानं मृत्यू; राज्यात तब्बल 'इतक्या' पोलिसांना कोरोनाची लागण..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: संरक्षण व सुरक्षा विभागात कार्यरत 53 वर्षीय पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत झालेल्या राज्यातील पोलिसांचा आकडा 49 वर पोहोचला आहे, तर मुंबईतही 33 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत चार हजारांहून अधिक पोलिसांना कोरोना बाधीत झाले आहेत.

मृत 53 वर्षीय पोलिस मुंबई पोलिस दलाच्या संरक्षण व सुरक्षा विभागात कार्यरत होते. ते गिरगाव येथील रहिवासी होते. 17 जूनला त्यांना कोरोना झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते.  ते दक्षिण मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार घेत होते.नुकतीच त्यांना उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

प्रकृती खालावल्यामुळे त्यांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व मुलगी असा परिवार आहे.

आतापर्यंत राज्यातील 4048 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. हायरिस्क कंटेनमेंट झोनमध्ये तैनात पोलिसांचे प्रमाण त्यात अधिक आहे. त्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, मालेगाव व राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांची संख्या अधिक आहे. 

राज्य राखीव पोलिस दलातीलही 741 कोरोनाबाधीत पोलिसांपैकी बहुसंख्य शहरी भागात तैनात होते. त्यातील 648 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात एक हजार पोलिस कोरोनावर उपचार घेत आहेत

53 years police is no more due to corona 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT