राज्य सरकारच्या एक निर्णय, अन् विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट  
मुंबई

राज्य सरकारच्या एक निर्णय, अन् विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. त्यानंतर आता आरोग्य विभागाकडून नव्याने आठ रुग्णालये; तर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 17 रुग्णालये अधिसूचित करण्यात आली आहेत. त्यामुळे अतिरिक्त 4355 खाटांची उपलब्धता झाली आहे. पूर्वी घोषित केलेल्या 30 रुग्णालयांतील 2305 खाटा आणि आताच्या 4355 खाटा अशा राज्यात एकूण 6660 खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 

दोन्ही विभागांनी काढलेल्या अधिसूचनांमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारमार्फत कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषित करण्यात आली असून, त्यासाठी आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी अधिसूचना काढली आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. 

सरकारच्या अधिसूचनेनुसार विभागाच्या अखत्यारीतील 30 रुग्णालये विशेष उपचारासाठी घोषित केली होती. त्यानंतर पुन्हा 6 एप्रिल रोजी ठाणे जिल्हा रुग्णालय, उल्हासनगर रुग्णालय क्रमांक 5, पालघर ग्रामीण रुग्णालय, नंदुरबार, जालना, बीड आणि नांदेड जिल्हा रुग्णालय आणि मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालय अधिसूचित झाल्याने त्यामधील एकूण 630 खाटांची उपलब्धता झाली आहे; तर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुणे, बारामती, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, अकोला, गोंदिया, चंद्रपूर, धुळे, लातूर, नांदेड, मिरज, औरंगाबाद, जळगाव आणि अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालये अधिसूचित केली आहेत. त्यामुळे एकूण 3725 खाटा कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT