BMC 
मुंबई

बापरे! तब्बल 600 अभियंत्यांना 'या' कामांसाठी जुंपले; महापालिकेचे विकासकामांकडे दुर्लक्ष..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेचे तब्बल 600 अभियंते कोरोनाचा रुग्ण आढळलेल्या इमारती सील करणे, रुग्ण शोधणे, कंटेन्मेंट झोन तयार करणे, रुग्णांचे अहवाल तयार करणे आदी कामे करीत असल्याने प्रकल्प आणि विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे अभियंत्यांना अभियांत्रिकी कामे करण्यासाठी परत बोलवा अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स असोशिएशनने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

पालिकेच्या अभियांत्रिकी, उपप्रमुख अभियंता, वास्तुविशारद, आर्किटेक्ट आदी विभागाचे सुमारे 600 अभियंते कोरोनाच्या कामासाठी जुंपले आहेत. मुंबईत सर्वच भागात कोरोनाचा झपाट्याने फ़ैलाव झाला आहे. कोरोनाचा वाढत असल्याचे लक्षात येताच पालिकेच्या अभियंत्यांना कोरोनावर नियंत्रण आणण्याच्या बिगर अभियांत्रिकी कामाला लावले आहे. 

हातातली कामे सोडून कोरोनाचा रुग्ण आढळलेल्या इमारती सील करणे, रुग्ण शोधणे, कंटेन्मेंट झोन तयार करणे, रुग्णांचे अहवाल तयार करणे, बेघर आणि मजुरांना अन्न वाटप करणे आदी  कामे त्यांना करावी लागत आहेत.

 त्यामुळे प्रकल्प आणि विकासकामे रखडली आहेत. अभियंत्यांना अभियांत्रिकी कामे करण्यासाठी परत बोलवा अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स असोशिएशनचे सरचिटणीस यशवंत धुरी यांनी  पालिका आयुक्तांकडे केली आहे.

अभियंत्यांच्या जागी त्याच खात्यातील बदली कामगार द्यावा, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, दुय्यम अभियंता, कनिष्ठ अभियंता आदी श्रेणीतील अभियंते हे उच्च शिक्षित आहेत. त्यांना कोरोनाची कामे लावण्यापेक्षा कारकून श्रेणीतील कामगारांना ही कामे द्यावीत, त्यांना अडीच महिने सुट्ट्याही मिळालेल्या नाहीत, अभियंत्यांचे अवमूल्यन करू नये अशी मागणी धुरी यांनी केली आहे.

600 engineers in BMC doing corona works read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अमित शाहांकडे राजीनामा अन् मोदींकडे माफीची मागणी; राहुल गांधींचं खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले?

प्राजक्ता माळी अन् प्रवीण तरडे यांच्यात टोकाचा वाद आणि गाजलेल्या चित्रपटाचं शूटिंग पडलेलं बंद; काय होतं कारण?

IND vs SL, Test: साई सुदर्शनच्या जागी सरफराजच का? ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होण्यामागचं कारण आलं समोर!

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

Management Admissions: राज्यात बीबीए-बीबीएम-बीएमएस व एकात्मिक एमबीए प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १२ हजार २८२ विद्यार्थ्यांना संधी, ८४८५ जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

SCROLL FOR NEXT