doctor doctor
मुंबई

मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांकडे सरकारचं दुर्लक्ष

मृत्यू झालेल्या डॉक्टरांची खात्रीशीर आकडेवारीही सरकारकडे नाही?

मिलींद तांबे

मुंबई : कोरोना Coronavirus काळात गेल्या दीड वर्षांपासून डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतील प्रत्येक व्यक्ती अहोरात्र रुग्णांसाठी झटत आहे. मात्र, दिवस-रात्र काम करुन रुग्णांची सेवा करणाऱ्या जवळपास ७० डॉक्टरांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. यात मुंबईतील Mumbai २५ डॉक्टारांचा समावेश असून अधिकतर डॉक्टर खासगी क्षेत्रातील असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या डॉक्टरांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे सरकारने मात्र पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच, या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (mumbai-25-doctors-have-died-in-the-second-wave-of-covid-but-their-families-are-not-getting-the-benefit)

पहिल्या लाटेप्रमाणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांचे प्राण गेल्याच्या घटना आपल्या कानावर आल्या. यात राज्यात 70 तर देशात 1200 पेक्षा अधिक डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला, आहे अशी माहिती डॉक्टरांची संघटना आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनकडून देण्यात आली.

कोरोना सुरु झाल्यापासून डॉक्टरांनी जराही उसंत घेतली नाही. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत कर्तव्य बजावले. यामुळे अनेक डॉक्टर बाधित झाले. तर, अनेकांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात मागील वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाने मृत्यू झालेल्या डॉक्टरांची संख्या 12 होती. त्यानंतर ती वाढत वाढत राज्यात 70 तर देशात 1200 वर पोहोचली आहे.

गेल्या दीड वर्षात केंद्र तसेच राज्य सरकारने डॉक्टरांना मदत करण्याविषयी अनेक आश्वासने तसेच घोषणा केल्या. ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी आयएमए संघटना सर्जार सोबत चर्चा करत आहे. शिवाय मृत डॉक्टरांना घोषित केल्याप्रमाणे विमा रक्कम देण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे. मात्र, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यापैकी कोणतीही यंत्रणा डॉक्टरांच्या मृत्यूची नोंदच ठेवत नसल्याची बाब आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली. इतकेच नाही तर मयत डॉक्टरांच्या खात्रीशीर आकडेवारी ही सरकारकडे नसल्याचंही ते म्हणाले.

सुरुवातीला खासगी डॉक्टरांना पीपीई किट मिळाले नव्हते. तीन आठवडे काम केल्यानंतर एक आठवडा क्वारंटाइन होण्याचा नियम दुसऱ्या लाटेत तर बंदच झाला. 55 वयोगटाच्या पुढील व गरोदर स्त्रियांना कोविड ड्युटी लावल्यामुळे मृत्यू वाढल्याचा आरोप ही त्यांनी केला. 'नवरा बायको दोन्ही आरोग्य सेवी कर्मचारी असताना एकाच व्यक्तीला कोविड ड्युटी लावण्याचा विचार करा', असे सांगूनही याबाबत लक्ष न दिल्याने दोघेही कोविडची बाधा झाल्याने दगावले असल्याची प्रकरणे आहेत.

"खासगी डॉक्टरांना विमा योजना लागू नसल्याने ते दगावल्यावर कुटुंबाला अडचणीना सामोरे जावे लागले. जीवावर उदार होऊन रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी आजतागायत सरकार बेड आरक्षित ठेवू शकले नाही ही शोकांतिका आहे. केवळ कोविड योध्या म्हणून संबोधले गेले. मात्र त्यांना शोकसंदेश किंवा त्यांच्या मृत्युनंतर काही सन्मान द्या अशी मागणी करून देखील ही मागणी मान्य झाली नाही", अशी खंत ही भोंडवे व्यक्त करत आहेत.

सरकारने डॉक्टरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. मयत खासगी डॉक्टरांच्या कुटुंबाकडे तर सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने 'कोविड शहीद फंड' नावाने मदत उभारणे सुरू केले असून निधन झालेल्या डॉक्टरांच्या कुटुंबियांना साधारणता 5 लाखांची मदत देणे आम्ही सुरू केले आहे. देशभरात आतापर्यंत 400 पेक्षा अधिक कुटुंबांना आम्ही मदत केली आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी दिली.

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पुणे जिल्हा परिषदेत ७३ पैकी ३७ जागांवर विजय! अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची रेकॉर्डब्रेक कामगिरी

Zilla Parishad Election Result: संभाजी नगरमध्ये पुन्हा एमआयएमची चमक; जिल्हा परिषदेत कुणाला किती जागा मिळाल्या?

Satej Patil Kolhapur : कंप्लीट धुरळा! राज्यातील पहिली सर्वात तरूण उमेदवार कोल्हापूरमधून काँग्रेसच्या सोनाली पाटील विजयी, गगनबावड्यात सतेज पाटलांनी गड राखला

Dharashiv ZP Election Result : एका मताचे महत्त्व ! ढोकीमध्ये ठाकरे सेनेच्या अमर समुद्रेंचा अवघ्या १ मताने विजय, भाजपच्या उमेदवाराचा निसटता पराभव

Patan ZP Election Result : पाटणच्या राजकारणात मोठा उलटफेर; पाटणकरांचा बालेकिल्ला ढासळला, शंभूराज देसाईंचे 'निर्भेळ' यश

SCROLL FOR NEXT