मुंबई

८२ वर्षीय सुपर आजीबाई, या आजीबाईंनी कोरोनाला हरवलं... 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : देशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. देशात सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १३०० च्या वर पोहोचला तर एकट्या मुंबईत ८०० अधिक कोरोना रुग्ण आहेत रुग्ण आहेत. ही चिंतेची बाब आहे. मात्र या चिंतेच्या वातावरणातही एक दिलासादायक बातमी आता समोर येतेय. मुंबईत एका ८२ वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केलीये.

वृद्ध व्यक्तींच्या शरीरात रोग प्रतिकारक क्षमता कमी असते त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती जास्त असते. कोरोनाचा वृद्ध नागरिकांना सर्वाधिक धोका आहे असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय. मात्र अनेक वृद्ध इच्छाशक्तीच्या बळावर त्यावर मात करत आहेत. मुंबईतल्या एका ८२ वर्षीय आजींनीही कोरोनावर मात केली आहे. त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.

या आजी काही दिवसांपूर्वी गुजरातमधून मुंबईत त्यांच्या घरी  आल्या होत्या. खबरदारी म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची वैद्यकीय चाचणी केली होती. त्यात या आजींना कोरोनाची लागण लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. या रुग्णालयात ७ दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र यशस्वी उपचारानंतर त्यांची दुसरी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे या आजी कोरोनामुक्त झाल्या आहेत.

"कोरोनाची लागण झाली असली तरी या आजींमध्ये कोरोनाची तीव्र नव्हती. तरीही त्या घरी येईपर्यंत आम्ही अस्वस्थ होतो. मात्र आता त्यांची प्रकृती उत्तम आहे," असं या आजींच्या मुलानं सांगितलंय. त्यामुळे या आजी कोरोनावर मात करणाऱ्या राज्यतल्या पहिल्या वृद्ध महिला ठरल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागानं बनविलेल्या अहवालानुसार ८१ ते ९० या वयोगटातल्या सुमारे १२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ९० वर्षांच्या पुढची एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली आहे.

82 years old woman won fight her fight against corona read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT