girl  
मुंबई

लॉकडाऊन : दूर देशी गेलेल्या बाबाच्या काळजीनं मुलीचा अन्नत्याग 

सकाळवृत्तसेवा

वसई : कोरोनाची भीती आणि त्यात बाबा परदेशात असल्याने त्यांची काळजी वसईच्या एका नऊ वर्षाच्या मुलीला सतावत होती. बाबा कधी येणार, कोरोना संपेल कधी या विचाराने तिने चार दिवस अन्नग्रहण करण्याचे टाळले. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी देखील याचा धसका घेतला मात्र,  मानसोपचार तज्ञ डॉ. वंदना पवार यांच्याशी तिच्या आईने संपर्क साधल्यानंतर मुलीची मानसिकता बदलण्यासाठी पवार यांचा प्रयोग यशस्वी झाला. पवार यांनी अशाच पद्धतीने कोरोना लॉकडाऊन काळात मुंबई व वसईतील अनेकांना समुपदेशन करून बरे केले आहे

वसईचे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चव्हाण यांनी वंदना पवार यांचा मानसिक तणाव व समुपदेशन या संदर्भात पवार यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमावर शेअर केला. यात त्याचा संपर्क क्रमांक देखील होता. हा व्हिडीओ पाहून वसईतील नऊ वर्षाच्या मुलीची लॉकडाऊन मध्ये झालेली मनस्थिती तिच्या आईने कथन केली. यावेळी पवार यांनी मुलीची आवड निवड समजून घेतली, तिला नृत्याची आवड असल्याचे समजताच घरी नृत्य कर आणि मला व्हिडीओ पाठव असे सांगितले,  नकारात्मकतेतून तिला सकारात्मककतेकडे आणण्याचा प्रयत्न केला असे मानसोपचार तज्ञ वंदना पवार यांनी सकाळशी बोलताना सांगितले. 

घरात राहण्याने चिडचिडपणा, भीती, दडपण, आर्थिक कोंडीने बेजार, चिंतेमुळे झोपेचा अभाव, नकारात्मकता गृहिणींवर वाढता ताण अशी लक्षणे दिसू लागली आहेत. मुंबईतील मानसोपचार तज्ञ डॉ. वंदना पवार या लॉकडाऊन मुळे सोलापूर येथे त्यांच्या गावी अडकल्या आहेत. परंतु फोनवरून मानसिक तणावाखाली आलेल्या लोकांना मार्गदर्शन करून त्यातून बाहेर काढत आहेत. वसईच्या 30 ते 35 तर मुंबईतील कोरोना पॉजेटिव्ह आलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशन करत असल्याने अनेक कुटुंबे त्यांनी सावरली असल्याचे त्यांनी सांगितले. 

लॉकडाऊनमध्ये काही कुटुंब चांगला वेळ घालवत आहेत, मात्र अनेक कुटुंबातील सदस्य मानसिक तणावाखाली आले आहेत. त्यांना भावनिक व मानसिक आधाराची गरज आहे. वसई, वरळी सह मुंबईतील अनेक कुटूंबातील सदस्यांना फोन वरून समुपदेशन करते. अनेक जण मानसिक तणावातून बाहेर येत आहेत. 
डॉ. वंदना पवार, मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक. 

 The abandonment of a daughter by the care of father read detail story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT