tax 
मुंबई

थकबाकीदारांना कर भरण्याची संधी, कल्याण-डोंबिवली पालिका राबवणार अभय योजना

सुचिता करमळकर

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रशासनाने पुन्हा एकदा अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 ऑक्‍टोबर ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यान ही योजना लागू असेल. मागील अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्या थकबाकीदारांनी कराच्या पूर्ण रकमेसह दंडाची 25 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित व्याज आणि दंडाची रक्कम माफ करण्यात येणार आहे. 

महापौर विनिता राणे यांनी पत्रकार परिषदेत अभय योजनेची घोषणा केली. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सभागृह नेते प्रकाश पेणकर, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, कर विभागाचे विनय कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. मार्च महिन्यापासून देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आला होता. देशातील अर्थव्यवस्थेप्रमाणेच पालिकेच्या आर्थिक स्थितीवरही याचा परिणाम झाला आहे. हे व्यवहार सुरळीत करण्याच्या दृष्टीने अभय योजना जाहीर करण्यात आल्याचे यावेळी आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले. थकबाकीदारांना 75 टक्के व्याजाची माफी तसेच दंड आकारणीतूनही या योजनेमुळे सूट मिळणार आहे. पालिकेच्या तिजोरीतही यामुळे काही निधी जमा होईल अशी अपेक्षा आहे. या जमा रकमेतून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसह शहरातील विकास कामांनाही ही चालना मिळेल. 

फलकांद्वारे योजनेची माहिती - 
मागील थकबाकीसह चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची एकूण मागणी 1387 कोटी इतकी आहे. यात 573 कोटी रुपये व्याजाची रक्कम आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत विशेषतः थकबाकीदारांना अभय योजनेची माहिती मिळावी यासाठी पालिका प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या अंतर्गत पालिकेच्या प्रत्येक प्रभागात किमान दहा फलकांद्वारे या योजनेची माहिती दिली जाईल. याचबरोबर पालिकेकडे शहरातील अनेक नागरिकांचे संपर्क क्रमांक आहेत, त्याद्वारे ही माहिती अधिकाधिक रहिवाशांना दिली जाईल. 

(संपादन  : वैभव गाटे)

Abhay Yojana to be implemented by Kalyan-Dombivali Municipality

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Expressway Toll System : आता ‘एक्स्प्रेसवे’वर टोल भरण्यासाठी गाडी थांबवून वाट पाहण्याची गरज नसणार!

Ichalkaranji Election : इचलकरंजी महापालिका निवडणुकीत उमेदवारीचा तिढा कायम; भाजप-महाविकास आघाडीत इच्छुकांची धावपळ आणि राजकीय अस्वस्थता वाढली

Jalgaon Municipal Election : आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कडक नियम; उमेदवारांना खर्च मर्यादेचा इशारा

BMC Election: आचारसंहितेवरून तंबी भंग केल्यास ४ तासांत कारवाई, महापालिकेचा इशारा

Chenpi : संत्र्याची साल विकून लोक बनतायत लखपती; 1 किलोची किंमत वाचून व्हाल शॉक, तुम्ही कसा करू हा शकता बिझनेस? पाहा

SCROLL FOR NEXT