abhishek bachchan 
मुंबई

अभिषेकचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ऐश्वर्या आणि जया बच्चन निगेटिव्ह

सूरज यादव

मुबई - बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता अभिषेक बच्चनलासुद्धा कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. अभिषेक बच्चनने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. अभिषेकने ट्विटरवर म्हटलं की, वडिलांसह माझीही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दोघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षणे असून रुग्णालयात दाखल झालो आहेत. आम्ही आवश्यक त्या सर्वांना याची माहिती दिली असून कुटुंबिय आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली आहे. कोणीही अस्वस्थ होऊ नका आणि शांत रहा असं आवाहन अभिषेकने केलं आहे. 

बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयात हलवलं आहे. कुटुंबीयासह इतरांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट यायचे आहेत.अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली आहे. तसंच गेल्या दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची टेस्ट करावी असंही त्यांनी सांगितलं आहे. जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचीही कोरोना टेस्ट कऱण्यात आली होती. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 
Big Breaking : महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आम्ही संपर्कात असून त्यांना सहकार्य करत आहे असंही अभिषेक बच्चनने म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विटवरून याची माहिती दिली होती. 

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचेही घर सील करण्यात आले होते. त्यांच्या बंगल्याचा सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर परिसर सील केला होता. त्यांच्या बांद्रा इथल्या घरावर बीएमसीने कंटेनमेंट झोन अशी नोटीसही लावली आहे.

बिग बी कौन बनेगा करोडपतीच्या 12 व्या सिझनमध्येही पुन्हा परतणार आहेत. या शोसाठी मे महिन्यात ऑडिशन घेण्यात आल्या आहेत. त्यांचे चेहरे, ब्रह्मास्त्र आणि झुंड हे चित्रपटही लवकरच येणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT