मुंबई

Dussehra Melava : "अर्ज फेटाळून अधिकारांचा दुरुपयोग केला"; हायकोर्टानं BMCला फटकारलं

शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला हायकोर्टाची अखेर परवानगी दिली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनाच्या उद्धव ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. त्यामुळं दसरा मेळावा कोणाचा होणार यावर आता पडदा पडला आहे. पण युक्तीवादादरम्यान, हायकोर्टानं मुंबई महापालिकेला फटकारलं आहे. अर्ज फेटाळून मुंबई महापालिकेनं आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला असं मत हायकोर्टानं नोंदवलं आहे. (abuse of powers by rejecting applications Mumbai High Court reprimanded the BMC on Dussehra Melava)

युक्तीवादादरम्यान, मुंबई महापालिकेनं सर्वात महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता तो म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा. त्याला आधार होता दादर पोलिसांनी दिलेल्या सुरक्षाविषयक अहवालाचा. त्याच मुद्द्यावर महापालिका दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. पण पालिकेचा मैदान नाकारण्याचा निर्णय वास्तविकतेला धरुन नसल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. अर्ज फेटाळून मुंबई महापालिकेनं आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला आहे, असं मत हायकोर्टानं नोंदवलं.

दरम्यान, पालिकेला दोन्हीकडच्या दाव्यांची कल्पना होती. तरीही २० दिवस परवानगीसाठी विलंब का केला, असंही मत हायकोर्टानं नोंदवलं आहे. पोलिसांचा जो अहवाल आलाय तो दादर पोलिसांच्या एकूण संख्येच्या आधारावर आला आहे. त्यामुळं दादर पोलिसांकडे संख्याबळ कमी असेल तर अतिरिक्त कुमक मागवली जाऊ शकते, असाही हायकोर्टाच्या टिपण्णीचा अर्थ होऊ शकतो.

२२ आणि २६ ऑगस्टला ठाकरे गटाकडून तर ३० ऑगस्टला शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी पालिकेकडे अर्ज देण्यात आले होते. ठाकरे गटानं म्हटलं की, २०१६ मध्ये शासन निर्णय दिलाय की शिवाजीपार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी आहे. त्यामुळं ती कोणत्या गटाला द्यायची हा अत्ताचा प्रश्न असला तरी दसरा मेळावा तिथेच व्हायला हवा. १९६६ पासूनची ही परंपरा आहे, त्यामुळं ही परवानगी आम्हाला मिळाली. त्यासाठी अर्जही आम्ही दरवर्षी करतो त्यामुळं आता ही परवानगी आम्हाला मिळावी असा दावा शिवसेनेनं हायकोर्टात केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : बीडमध्ये कुणाची सत्ता येणार, धनंजय मुंडेंना धक्का?

Indian travelers in USA: भारतीय प्रवासी अमेरिकेत किती दिवस राहू शकतात? दूतावासाने जारी केल्या सूचना ; व्हिसावर अवलंबून नाही

Pune Cyber Crime: सायबर फसवणुकीतून कोटींची लूट; शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल

Pune Cold Weather: पुण्यात पुन्हा थंडीचा कडाका; किमान तापमान ८.१ अंशांवर, पहाटे गारठा

Maharashtra Cold Wave: : राज्यात पुन्हा थंडीची लाट, हुडहुडी वाढली; आज दिवसभरात कसे असेल हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT