AC Local Sakal
मुंबई

Mumbai Local: खुसखबर: मरेनंतर आता पश्चिम रेल्वेवरपण एसी लोकल फेऱ्या!

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local: मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलच्या १७ नवीन लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून (ता. ६) या फेऱ्या धावणार असून, पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलची संख्या ७९ वरून ९६ होणार आहे.

तिकीट दर कपातीनंतर एसी लोकलच्या प्रवासी संख्येत प्रचंड वाढ झाली. त्यात सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत एसी लोकलमध्ये प्रवासी संख्या मोठी असते. बहुतांश वेळा या लोकलचे दरवाजेही बंद होत नाहीत.

त्यामुळे वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेने सोमवारपासून एसी लोकलच्या १७ फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकल सोमवार ते शुक्रवार एसी सेवा म्हणून धावतील; तर शनिवार आणि रविवारी नॉन-एसी सेवा म्हणून धावतील. वाढीव फेऱ्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील दिवसभरात धावणाऱ्या एकूण लोकलची संख्या एक हजार ३९४ झाली आहे.

याशिवाय डहाणू रोड आणि अंधेरी स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लोकल चर्चगेट स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहेत. या वाढीव फेऱ्यांमध्ये अप मार्गावर नऊ आणि डाऊन मार्गावर आठ एसी लोकल आहेत.

असे असणार एसी लोकलचे वेळापत्रक

  • अप मार्ग

  • स्थानक प्रकार वेळ

  • नालासोपारा-चर्चगेट धीमी पहाटे ४.५५

  • बोरिवली-चर्चगेट जलद सकाळी ७.४७, ९.३५, ११.२३

  • विरार-चर्चगेट जलद दुपारी १.३४

  • विरार-बोरिवली धीमी दुपारी ४.४८

  • बोरिवली-चर्चगेट जलद सायंकाळी ५.२८

  • विरार-चर्चगेट जलद सायंकाळी ७.५१

  • भाईंदर-बोरिवली धीमी रात्री १०.५६

    डाऊन मार्ग

  • स्थानक प्रकार वेळ

  • चर्चगेट-बोरिवली धीमी सकाळी ६.३५

  • चर्चगेट-बोरिवली जलद सकाळी ८.४६

  • चर्चगेट-बोरिवली जलद सकाळी १०.३२

  • चर्चगेट-विरार जलद दुपारी १२.१६, ३.०७

  • चर्चगेट-विरार जलद सायंकाळी ६.२२

  • चर्चगेट-भाईंदर धीमी रात्री ९.२३

  • बोरिवली-विरार धीमी रात्री ११.१९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagaland IED Blast: आसाम रायफल्सच्या ताफ्याजवळ IED ब्लास्ट! १ जवान शहीद, ४ जण जखमी; स्फोटानंतर मोठे सर्च ऑपरेशन

Leopard Attack in Pune: शिंगवे परिसरात दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला; प्रसंगावधानामुळे जीव वाचला, ग्रामस्थांची पिंजरा लावण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने अंकित शर्मा यांची हत्या आणि दंगल यांसारख्या गुन्ह्यांसाठी ताहिर हुसेनला दोषी ठरवले

Cemetery Wall Repair: ‘सकाळ’च्या वृत्ताला प्रतिसाद; दावडी स्मशानभूमी भिंत दुरुस्तीला १० लाख मंजूर, आणखी निधीची ग्रामस्थांची मागणी

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी अलर्ट! आता 'इथून' ट्रेनमध्ये चढलात तर गुन्हा दाखल होणार; रेल्वेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT