जीवनदानी यात्रा.j 
मुंबई

पालघरमध्ये नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग; जीवदानी मंदिरामध्ये रंगरंगोटीस सुरुवात 

संदीप पंडित

विरार,   नवरात्रोत्सव जवळ आल्याने पालघरमधील विविध ठिकाणी असलेल्या देवीच्या मंदिरांमध्ये तयारीला वेग आला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणूची महालक्ष्मी, केळव्याची शीतला देवी, जूचंद्रची चंडिका आणि विरारच्या जीवदानी देवी या ठिकाणी नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून देवस्थाने बंद असल्याने मंदिरे कधी उघडणार, या प्रतीक्षेत भाविक आहेत. नवरात्रमध्ये मंदिर उघडण्यास परवानगी मिळेल, अशी आशा देखील काही भाविकांनी बोलून दाखविली. मंदिर उघडण्याबाबत अद्यापही ठोस निर्णय झाला नसला तरी सर्वच देवस्थानांनी नवरात्रोत्सवाची तयारी मात्र सुरू केली आहे. 


नवरात्रीमध्ये डहाणूची महालक्ष्मी, केळव्याची शीतला देवी, जूचंद्रची चंडिका माता या ठिकाणी भाविकांची गर्दी होत असते. विरारच्या पूर्वेला असलेल्या जीवदानी मंदिरात तर नऊ दिवस लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात, तर दसऱ्या एकाच दिवशी लाखभर लोक दर्शनासाठी येतात; परंतु या वर्षी मात्र देवालये बंद असल्याने नवरात्रोत्सव मंदिरात ट्रस्टींच्या उपस्थितीत साजरा होणार असल्याचे चित्र आहे. 


नवरात्रोत्सवाच्या दृष्टीने मंदिर ट्रस्टने मंदिराची साफसफाई आणि रंगरंगोटीचे काम हाती घेतले आहे. सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी दिली तरी सोशल डिटन्सिंग, सॅनिटायझेशन आदी नियमांची अंमलबजावणी कठोर पद्धतीने करण्यात येईल. 
                -पंकज ठाकूर, उपाध्यक्ष, जीवनदानी मंदिर ट्रस्ट 

( संपादन ः रोशन मोरे)

 Accelerate the preparations for Navratri in Palghar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT