मुंबई

 तो तिला गोडबोलून घरी घेऊन जायचा आणि...

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : दररोज महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येतच आहेत. ठाण्यात देखील अशीच एक अमानुष घटना समोर आली असून एका नराधमाने अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आले आहे.


अत्याचार करणाऱ्या आरोपी तरुणाला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली असून दीपेश सुतार (२२) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी (ता.२१) वर्तकनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील लोकमान्यनगर, पाडा नंबर १ परिसरातून ही घटना समोर आली आहे. आरोपी दीपेशने पीडित पाच वर्षीय मुलीला गोड बोलून घरी नेले; तसेच घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

त्यानंतर पीडित मुलगी घरी आल्यावर आजारी पडल्याने तिच्या आईने उपचारासाठी तिला दवाखान्यात नेले. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने दीपेश याचे नाव सांगितल्यावर सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर, याप्रकरणी मंगळवारी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून नराधम दीपेश याला अटक करण्यात आली.  

web title : The accused arrested for torturing little girl

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Rate : सांगली जिल्ह्यातील आठ कारखान्यांची पहिली उचल 3900 ते 4000 रुपये जाहीर; जाणून घ्या कोणत्या कारखान्याचा किती दर? कोणी दिला सर्वाधिक दर?

Makarand Patil: अजित पवारांनी दिलेला शब्द राष्ट्रवादीने पाळला; उदयसिंह पाटलांना योग्य सन्मान, मकरंद पाटलांचे विधान

मालिकेत सावत्र आई-मुलगी, पण खऱ्या आयुष्यात बेस्ट फ्रेंड्स! 'कमळी' फेम गौरी-अनिकाचा भन्नाट डान्स, Viral Video

Marathi News Live Updates : ओंकार हत्तीवरून ग्रामस्थ आणि वनकर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी

Bandra Accident: वांद्र्यात हिट अँड रन! वेस्टर्न एक्सप्रेसवेवर BMWने महिलेला उडवलं, जागीच मृत्यू; आरोपी व्यावसायिकाची जामिनावर सुटका

SCROLL FOR NEXT