Fraud
Fraud sakal
मुंबई

Mumbai:मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीच्या बहाण्याने देशभरात 50 हून जास्त नागरिकांची फसवणुक;आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

शुभम पितांबरलाल गुप्ता असे आरोपीचे नाव असून त्याला उत्तर प्रदेशातील कानपूर येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. आरोपीने मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी शुभम गुप्ताने फेसबुकवर व्ही आर मरीन या नावाने बनावट खाते तयार केले आणि त्या बनावट खात्याचा वापर करत देशभरातील 50 ते 60 नागरिकांची मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली.

फसवणूक झालेल्या व्यक्तीने मुंबईच्या आंबोली पोलीस ठाण्यात ऑगस्ट 2022 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आंबोली पोलिसांनी पथक नेमून तपास सुरू झाला.

आरोपीने तयार केलेल्या फेसबूक खात्याचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आरोपीचा शोध लागला. त्वरित पोलीसांचे एक पथक कानपुरला पोहोचले.

स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी शुभम गुप्ताला त अटक करून ट्रान्झिट रिमांडवर मुंबईतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली, असल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून देशभरातील 50 हून अधिक नागरिकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT