वृत्तपत्र वितरणाला मज्जाव केल्यास कारवाई; जिल्हा उपनिबंधकांचा सोसायट्यांना इशारा 
मुंबई

वृत्तपत्र वितरणास मज्जाव केल्यास कारवाई; जिल्हा उपनिबंधकांचा सोसायट्यांना इशारा

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : घरोघरी वृत्तपत्र वितरणास राज्य शासनाने परवानगी दिली असतानाही काही गृहनिर्माण संस्थाचे (सोसायटया) पदाधिकारी वृत्तपत्र विक्रेत्यांना प्रवेश नाकारून वितरणात अडथळा आणत आहेत. याबाबत जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील यांनी मज्जाव करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा परिपत्रकादवारे जारी केला आहे.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे घरोघरी वृत्तपत्र वितरणात खंड पडुन वृतपत्र विक्रेत्याना याची सर्वाधिक झळ बसली.मात्र,जूनच्या पहिल्या आठवडयात राज्य शासनाने लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करून घरोघरी वृत्तपत्र वितरणास परवानगी दिली. मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीने ठाण्यातील काही सोसायटयाच्या पदाधिकाऱ्यांनी पेपरवाल्या मुलांना गृहसंकुलाच्या प्रवेशद्वाराच्या आत घेण्यास मज्जाव केल्याची तक्रार वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनने जिल्हा प्रशासन तसेच, पोलिसांकडे केली होती. 

त्यावर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तातडीने निर्णय घेत जिल्हा उपनिबंधकांना कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानुसार, वृत्तपत्र वितरणास मज्जाव करणाऱ्या गृहनिर्माण संस्था व सदस्यांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 154 ब (27) (1) या कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपनिबंधक शहाजी पाटील यांनी दिला आहे. याबाबतच्या सुचना जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांना अवगत करण्यात आल्या आहेत.

घरपोच वृत्तपत्र वितरणास सरकारने परवानगी दिलेली असल्याने गृहानिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना वृत्तपत्र विक्रेत्यांना मज्जाव करता येणार नाही. तरीही,बं दी अथवा निंर्बध आणल्याची तक्रार सोसायटीतील संबधित ग्राहकाने केल्यानंतर तक्रारीची शहानिशा तसेच, सुनावणी घेऊनच पद बरखास्तीची कार्यवाही होऊ शकते.
शहाजी पाटील, ठाणे जिल्हा उपनिबंधक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT