धावत्या लोकलवर फुगे फेकल्यास होणार कारवाई! 
मुंबई

धावत्या लोकलवर फुगे फेकल्यास होणार कारवाई!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : धावत्या लोकलमध्ये रंगाचे आणि पाण्याचे फुगे धूलिवंदनच्या दिवशी एकमेकांवर फेकले जातात. त्यावर रोक लावण्यासाठी ठिकठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाला तैनात करण्यात येणार आहे. त्यासह, जनजागृती कार्यक्रम, रेल्वे रुळाशेजारी सुरक्षा वाढविणे, रेल्वे रुळालगत होळी न पेटवणे अशा उपाययोजना करण्याचा प्रयत्न मध्य आणि पश्‍चिम रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

पश्‍चिम रेल्वे मार्गावरील माहीम, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, विरार, मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला, सायन, घाटकोपर, ठाणे आणि हार्बर मार्गावरील मानखुर्द, वडाळा या स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने फौजफाटा वाढविण्यात येणार आहे. धावत्या लोकलवर फुगे मारताना कोणी दिसल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्टी वस्त्यांमध्ये जनजागृती रॅली काढण्यात येते. रेल्वे रुळालगत होळी न पेटवण्यासाठी जनजागृती केली जात आहे. 
- अश्रफ के. के., वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे.

लोकलवर रंगाने भरलेले फुगे फेकल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- विनीत खरब, वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, पश्‍चिम रेल्वे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतावर टॅरिफचा अमेरिकेचा निर्णय योग्यच, झेलेन्स्कींनी कारणही सांगितलं

धक्कादायक! चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार...कुटुंबीय गणपती विसर्जनाला गेले असता घडला प्रकार, गुन्हा दाखल

Burning Mouth Syndrome: तोंडात सतत जळजळ जाणवतेय? यामागील कारणे, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

लफडं लपवण्यासाठी आईनंच घोटला पोटच्या 6 वर्षांच्या पोरीचा गळा; 17 वर्षीय प्रियकराच्या मदतीने मृतदेह फेकला विहिरीत

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत दाखल

SCROLL FOR NEXT