मुंबई

बॉलिवू़ड हादरलं! आणखी एका अभिनेत्याला कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : लॉकडाऊन वाढवल्यानंतरही कोरोना देशात हातपाय पसरत आहे. जगभरात कोरोना विषाणूची लागण काही सेलिब्रिटींनाही झाली. आता कोरोनामुळे संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे. अभिनेते किरण कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.

किरण कुमार यांना कोरोनाची लागण झाली हे वृत्त सगळीकडे वाऱ्यासारखं पसरले. आश्चर्य म्हणजे त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. याबाबत किरण यांनी स्वतः खुलासा केला आहे. किरण सांगतात, मी 14 मेला कोरोनाची चाचणी केली. या रिपोर्टमध्ये मला कोरोना झाला असल्याचे समजले. विशेष म्हणजे मला कोरोनाची कोणतीच लक्षणे नव्हती. मी अगदी ठणठणीत होतो. ताप, सर्दी, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होणे असे काहीच मला होत नव्हते. तरीसुद्धा रिपोर्ट केल्यानंतर मला कोरोना झाला असल्याचे स्पष्ट झाले. माझे घर दुमजली असल्याने मी घरामध्येच क्वारंटाईन झालो आहे. घर मोठ असल्याने मला घरातच राहून उपचार घेण्यास कोणतीच अडचण निर्माण होत नाही.

26 मे रोजी दुसरी चाचणी
सध्या वेगवेगळ्या मजल्यावर किरण आणि त्यांचे कुटुंबिय राहत आहेत. किरण यांची पत्नी आणि मुले हे सध्या एका रुममध्ये क्वारंटाईन झाले आहेत. सध्यातरी त्यांची प्रकृती व्यवस्थीत आहे. आता 26 मे दरम्यान पुन्हा किरण यांची कोरोनाची दुसरी चाचणी करण्यात येणार आहे. किरण यांनी वयाची सत्तरी ओलांडल्यामुळे त्यांचे कुटुंबिय देखील त्यांच्या तब्येतीकडे अधिक लक्ष देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT