मुंबई

मोठी बातमी : तनुश्री दत्ताच्या वकिलावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, अंधेरी : अभिनेत्री तनुश्री दत्ताचे वकील नितीन सातपुते यांच्या विरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तक्रारदार महिलेने सातपुते यांनी अश्लील संभाषण केल्याचा आरोप केला आहे.

माहिम येथे राहणा-या 47 वर्षीय महिलेच्याच इमारतीमध्ये नितीन सातपुते राहतात. त्यांनी घराच्या समोरील पटांगणात गार्डन तयार केले होते. याबाबत सोसायटीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यात सोसायटीने हे गार्डन हटवून लहान मुलांना खेळण्यासाठी जागा करावी,  असे सांगितले. याचाच राग मनात धरून २ जानेवारी, २०२० रोजी रात्री सिनेमा पाहून घरी परतणाऱ्या कुटुंबाला लिप्टमध्ये गाठून फिर्यादीच्या पतीला  तुझ्या बायकोला समज दे, असे सांगितले.

त्यानंतर २० मिनिटाने फिर्यादी यांच्या मोबाईलवर सातपुते यांनी फोन केला. फोन उचलल्यानंतर सातपुते यांनी महिलेला शिवीगाळ केला. सातपुते म्हणाले माझ्या विरोधात कारस्थान करते काय? तुला आणि तुझ्या कुटुंबाला सोडणार नाही अशी धमकी दिली. याबाबत माहीम पोलीस पाण्यात तक्रार करण्यात आली. सदर तक्रारी राज्य महिला अयोग्य येथे तक्रार अर्ज केल्याने महिला आयोगात ३० डिसेंबर, २०१९ रोजी सुनावणीसाठी आलेले नाही.

सदर सुनावणीला हजर सातपुते आले तेव्हा त्यांनी तक्रारदार महिलेच्या जवळ येऊन कानामध्ये अश्लील भाषेत वल्गना केली आणि मनात लाज वाटेल उत्पन्न होईल असे संभाषण केले. फिर्यादि यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. 
दरम्यान याप्रकरणी वकील नितीन सातपुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याविरोधात हे षड्यंत्र असल्याचे सांगितले.

Webtitle : case registered against tanushree duttas advocate in molestation case

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT