Electricity Supply to Navtratrotsav mandal

 

ESakal

मुंबई

Electricity Supply: अदाणींकडून नवरात्रोत्सव मंडळांना दिलासा! घरगुती दराने वीजपुरवठा देण्याची घोषणा

Navratri 2025: उपनगरातील नवरात्रोत्सव आणि दुर्गापूजा मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा होणार आहे. त्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीने मंडपांत तात्पुरती वीजजोडणी घेण्याची प्रक्रिया सोपी केली आहे.

CD

मुंबई : गणेशोत्सवाप्रमाणेच आता उपनगरातील नवरात्रोत्सव आणि दुर्गापूजा मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा होणार आहे. त्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीने कंबर कसली असून मंडळांना आपल्या मंडपांत तात्पुरती वीजजोडणी घेण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. सुरक्षा आणि कार्यक्षमता यांच्याशी कोणतीही तडजोड न करता नवरात्री मंडळांना अर्ज केल्याच्या ४८ तासांच्या आत वीजजोडणी दिली जाणार आहे.

अदाणी इलेक्ट्रिसिटीने यंदा गणेशोत्सवात ९५० मंडपांमध्ये तात्पुरती वीजजोडणी देण्यात आली होती. तसेच महापालिकेच्या १५ प्रभागांत गणेश विसर्जनाच्या १६७ स्थळांवर १,५७१ फ्लड लाइट लावण्यात आले होते. त्यामुळे भक्तांना सुरक्षित आणि आनंदी वातावरणात उत्सव साजरा करता आला. त्याच पार्श्वभूमीवर सर्व नवरात्रोत्सव आणि दुर्गापूजा आयोजकांनी सहजपणे वीजजोडणी देण्याची तयारी केली आहे.

त्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या www.adanielectricity.com या वेबसाईटवर न्यू कनेक्शन या विभागात जाऊन तात्पुरत्या वीजजोडणीसाठी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. मागील वर्षी ६४७ दुर्गापूजा-नवरात्री मंडळांना सातत्यपूर्ण वीजपुरवठा केला होता.

कधी सुरु होणार नवरात्र?

दरवर्षी पितृपक्षाच्या समाप्तीनंतर शारदीय नवरात्र साजरी केली जाते. नवरात्र हा देवी दुर्गाला समर्पित ९ दिवसांचा पवित्र उत्सव आहे. या वर्षी शारदीय नवरात्र आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होत आहे. २२ सप्टेंबर २०२५ रोजी नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. नऊ रात्री आणि दहा दिवसांत, देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची विधिवत पूजा केली जाते, ज्यांना नवदुर्गा म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील १.२६ कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना मिळणार आर्थिक लाभ; मुख्यमंत्री यादव यांची घोषणा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचा वापर मतांच्या राजकारणासाठीचं, निवडणुक जवळ आली पाणीप्रश्‍न पेटला; स्थानिक नेत्यांकडून जनतेच्या समस्यांना केराची टोपली

Charlie Kirk: ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्या हत्येप्रकरणी एफबीआयने संशयिताला ताब्यात घेतले

SCROLL FOR NEXT