Aditya Narayan  
मुंबई

'अलिबागकरांचा नाद नाही करायचा', आदित्य नारायणचा माफीनामा

काय म्हणाला होता आदित्य नारायण ?

दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इशाऱ्यानंतर गायक, सूत्रसंचालक आदित्य नारायणने (aditya narayan) माफी मागितली आहे. 'इंडियन आयडॉल' (indian idol) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या आदित्यने एका एपिसोडमध्ये स्पर्धक सवाई भट्टला 'आम्ही अलिबागवरुन (alibaug?)आलोय असं तुला वाटतं का?' असा प्रश्न विचारला होता. (aditya narayan apologise to people of alibaug & everyone for hurting sentiments in indian idol episode)

आदित्यच्या त्या विधानावर मनसेने आक्षेप घेतला होता. अलिबागची प्रतिष्ठा कमी करुन अलिबागला थट्टेचा विषय बनवल्याचा आरोप मनसेने केला होता. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 'इंडियन आयडॉल' कार्यक्रम आणि वाहिनी विरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आदित्य नारायणने माफी मागितली आहे.

'इंडियन आयडॉल'च्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात माझ्या विधानामुळे जे दुखावले गेले, त्या सर्वांची, अलिबागकरांची मी हातजोडून माफी मागतो. कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मला अलिबागबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे. अलिबागच्या जनतेशी, तिथल्या मातीशी माझ्या स्वत:च्या भावना जोडलेल्या आहेत" असे आदित्य नारायण म्हणाला.

'यापुढे माझ्या अलिबागकरांचा नाद नाही करायचा,Last Warning🙏🏽काना खाली आवाज़ निघेल' असा इशाराच मनसेच्या चित्रपट सेनेकडून देण्यात आला होता. अमेय खोपकर यांनी तसे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते.

राष्ट्रीय स्तरावर अलिबागबद्दल अशा पद्धतीचे विधान केल्याबद्दल अमेय खोपकर यांनी फेसबुक LIVE मध्ये निषेध केला. मनसे कार्यकर्त्यांकडून आपल्याला आदित्य नारायणने अलिबागबद्दल केलेल्या या विधानाबद्दल समजले, असे त्यांनी सांगितले. आदित्यच्या या विधानाबद्दल अमेय खोपकर आदित्यचे वडिल प्रसिद्ध गायक उदित नारायण आणि कार्यक्रम प्रक्षेपित करणाऱ्या वाहिनीच्या लोकांबरोबरही बोलले होते.

'पुढच्या भागामध्ये माफी पाहिजेच, अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने कारवाई करेल' याची अमेय खोपकरांनी वाहिनीच्या लोकांना कल्पना दिली होती. मागच्यावर्षी सुद्धा अशाच प्रकारचा वाद झाला होता. त्यावेळी सुद्धा मनसेने इशारा दिला होता. बिग बॉसमध्ये एका स्पर्धकाने दुसऱ्या स्पर्धकाला मराठीमध्ये बोलू नकोस, असे सांगितले होते. हा वाद पेटल्यानंतर स्पर्धकाने नंतर माफी मागितली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT