Aditya Thackeray  Sakal
मुंबई

आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज; 'त्या' अधिकाऱ्याचं नाव सांगाच!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी समोरासमोर चर्चा करावी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलं आहे. राज्यातील प्रकल्पांबाबत खोट बोलताना टाटाच्या 'त्या' अधिकाऱ्याचं नाव सांगा. तसेच मुख्यमंत्र्यांनी आपल्याशी समोरासमोर चर्चा करावी, असं त्यांनी म्हटलं आहे. (Aditya Thackeray gives challenge to CM DCM of Maharashtra regarding Tata Airbus Project)

आदित्य ठाकरे म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांना मी चॅलेंज करतो की, त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, टाटाच्या उच्चाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की, महाराष्ट्रात वातावरण चांगलं नाही. फडणवीसांनी त्या अधिकाऱ्याचं नाव सांगावं. दादागिरी ही सत्ताधारी पक्षाचीच चालते. आमच्याकडून कोणाला काही धोका नाही. त्यांनी नाव सांगावं की आम्हाला टाटाच्या या अधिकाऱ्यानं सांगितलं की, मविआच्या काळात उद्योगासाठी वातावरण चांगलं नव्हतं.

टाटा एअरबसचा हा प्रस्ताव जर सप्टेंबर २०२१ मध्ये ठरला असेल तर नितीन गडकरींनी कंपनीला पत्र का लिहिलं? जर सन २०१६ पासून तुम्ही पाठपुरावा करत असाल तर तुमचं स्वतःचं सरकार राज्यात आणि केंद्रात असताना तुम्ही नागपूरच्या मिहानमध्ये प्रकल्प का आणू शकला नाहीत? हे खोटं बोलण्याचं नाटक सुरु आहे ते संपायला हवं. उपमुख्यमंत्री म्हणले की, देशातील विविध राज्यांमध्ये कॉम्पिटिशन वाढत आहे. मग महाराष्ट्र यात कुठे कमी पडतोय का? माझं हे चॅलेंज मुख्यमंत्र्यांनी स्विकारावं आणि माझ्याशी समोरासमोर चर्चा करावी.

राज्य सरकारचं अपयश झाकायला केंद्राकडं बोट दाखवलं जातंय

आजच्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधून शिंदे-फडणवीस सरकारचं अपयश झाकायला केंद्र सरकारडं बोट दाखवलं जात आहे. महाराष्ट्रात मविआचं सरकार होतं तेव्हा केंद्राचं आणि राज्याचे संबंध चांगले होते. पण अत्ताच ते का बिघडलेत की सर्व प्रकल्प राज्याबाहेर जाताहेत? असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारला.

फडणवीसांनी शब्द मागे घ्यावेत

जे बेरोजगार तरुण नोकरीसाठी आंदोलन करतात त्यांना गृहमंत्र्यांनी आज शेंबडी पोरं असं संबोधलं. खरतरं ही व्यक्तव्यं आमदारांनी रागात केली, असं फडणवीसांनी सांगितलं. पण हे चुकीचं असून त्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, कारण हा पत्रकारांचा आणि तरुणांचा अपमान आहे.

समृद्धी महामार्गाचं उद्घाटन कधी होणार?

समृद्ध महामार्गाची उद्घाटनाची तारीख अजून ठरलेली नाही का? यासाठी तुम्ही कुठल्या निवडणुकीची वाट पाहात आहात का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT