मुंबई

आदित्य ठाकरेंचा हिरव्या बॅनरवरचा व्हायरल फोटो, नेमकं काय आहे सत्य

प्रीती शर्मा मेनन यांनी हा फोटो टि्वट करत 'भगवा झाला हिरवा' असा संदेश लिहिला आहे.

सुमित सावंत

मुंबई: मराठी माणसाच्या (Marathi manoos) हक्कासाठी उभी राहिलेली शिवसेना (shivsena) कायम हिंदुत्वासाठी (Hindutva) पुढाकार घेत असलेली सगळ्या जगाने पाहिलीय. पण हीच शिवसेना गेल्या काही काळापासून सर्वसमावेशक होऊ पाहतेय का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्याला कारणं अनेक आहेत पण सध्या या संदर्भातील चर्चा अधिक रंगू लागली त्याचं मुख्य कारण आहे, सोशल मीडियावर (social media) व्हायरल होणारा आदित्य ठाकरेंचा एक फोटो.

वरळीमध्ये एका मोठ्या हिरव्या रंगाच्या कटआऊटवर आदित्य ठाकरेंचा सफेद रंगाचा कुर्त्यामधला फोटो व्हायरल झाला आहे. फोटोच्या शेजारी ऊर्दू भाषेत 'नमस्ते वरळी' असा संदेश लिहिला आहे. आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य प्रीती शर्मा मेनन यांनी हा फोटो टि्वट करत 'भगवा झाला हिरवा' असा संदेश लिहिला आहे.

आदित्य ठाकरेंच्या त्या फोटोवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्यानंतर आमच्या प्रतिनिधीने तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी नेमकं सत्य समोर आलं. आदित्य ठाकरेंचा हिरव्या फलकावरील व्हायरल झालेला हा फोटो खोटा आहे. प्रत्यक्षात त्या फलकावर एका कंपनीची जाहिरात आहे, आदित्य ठाकरे यांचा फोटोच नाहीय. कोणीतरी मुद्दामून हा खोडसाळपणा केल्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत. या मतदारसंघात मराठीजनांबरोबर अन्य भाषिक मतदारांचीही संख्या लक्षणीय आहे. यापूर्वी सुद्धा आदित्य ठाकरेच्या बॅनरवरील अन्य भाषेतील मजकुरांची माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली होती. सध्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्तेमध्ये आहे. त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याचा विरोधकांकडून नेहमी आरोप केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT