Goregaon Fire Esakal
मुंबई

Goregaon Fire: 'विरोधक म्हणून आम्हाला आरोप करणं सोपं पण...', गोरेगाव आगीवर आदित्य ठाकरेंचा राजकारण्यांना सल्ला

गोरेगाव येथे पहाटे एका इमारतीच्या पार्किंगला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईतील गोरेगाव येथे पहाटे एका इमारतीच्या पार्किंगला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर ५१ जण जखमी झाले आहेत. यातील मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींवर उपचारांसाठी नुकसान भरपाई जाहीर केली आहे. त्याठिकाणी आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. रहिवाशांशी चर्चा केली. घटनेची संपुर्ण माहिती जाणून घेतली.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेत ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. प्रार्थना इतकीच आहे, आता गंभीर आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी होईल पण, आज या सर्वांना धीर देणं गरजेचं आहे, असं ते म्हणालेत.

तर आज आपण जिथं उभं आहोत, तिथे दुर्घटना घडली आहे, या गोष्टीचं राजकारण करू नये. कोणत्याही गटाचे नेते असतील तर त्यांनी या दुर्घटनेत राजकारण आणू नये. राजकारण करणं योग्य राहणार नाही. या घटनेची चौकशी होईल पण, गंभीर असतील त्यांच्या चांगल्या होण्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे, असंही ते म्हणालेत.

कोणत्याही लोकप्रतिनिधीने आज कोणावरही आरोप लावू नयेत. तसं पाहायला गेलं तर विरोधक म्हणून आम्हाला आरोप लावणं सोपं असतं. आज ती वेळ नाही आरोप लावण्याची चौकशी होणारचं आहेत. कोणीही यामध्ये राजकारण करू नये. पण, कितीही कोणीही आरोप केले तरी आम्ही जबाबदार विरोधक आहोत. योग्य ती काळजी घेतली पाहिजे अशा घटना होऊ नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे, असंही ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Car Accident: पुण्यात भीषण अपघात! झाडाला एवढी जोरदार धडक की उन्मळून पडले, कारचा चक्काचूर... चालक स्टेअरिंगमध्ये अडकला

Bride Runs Away With Cash : लग्नाच्या पाचव्या दिवशी नवरी फरार; पती मिठाई आणायला जाताच रस्त्यात सोडून दागिने, रोख रक्कम घेऊन पोबारा

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठा बदल! खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली; महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती?

Nashik Shalarth Scam: १६० कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात मोठा ट्विस्ट; फार्महाऊसवर लपलेल्या संस्थाचालकाला अटक, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai Local: लोकलचा स्पीड आणखी वाढणार, दररोज ४,००० फेऱ्या; रेल्वे प्रशासनाची नवी योजना, कधीपासून होणार सुरु?

SCROLL FOR NEXT