मुंबई

कोरोना झाल्यापासून ७ ते १० दिवसात शरीरात तयार होतात अँटीबॉडीज्; मात्र परत कोरोना होण्याचा धोका किती?

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या COVID-19 या रोगावर अजून कुठल्याही प्रकारचं औषध उपलब्ध नाहीये. मात्र तरी काही कोरोनाग्रस्त रुग्ण स्वतःच्या प्रचंड इच्छा शक्तीमुळे आणि रोगप्रतिकारक क्षमतेमुळे या रोगावर मात करण्यात यशस्वी होत आहेत. मात्र कोरोनातून बरे होऊनही काही रुग्णांना परत कोरोनाची लागण झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय.

कोरोनाचे सर्व रिपोर्ट नेगेटिव्ह येऊनही रुग्णाला परत कोरोनाची लागण झाल्यामुळे डॉक्टरही चिंतेत आहेत. आपल्या शरीरात कोरोना व्हायरस गेल्यावर ८-९ दिवसांनी शरीरात या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अँटीबॉडीज तयार व्हायला सुरुवात होते. या अँटीबॉडीज आपल्याला या व्हायरसपासून सुरक्षित ठेवण्याचं काम करतात. ज्यामुळे व्हायरसचं प्रमाण कमी होत जातं आणि त्या रुग्णाचे रिपोर्ट निगेटिव्ह येतात. या अँटीबॉडीज हा व्हायरस निघून गेल्यानंतरही काही दिवसांपर्यंत राहतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र असं असलं तरी परत कोरोनाची लागण होणं ही चिंतेची बाब आहे.

जेव्हा एखाद्या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्याला कोरोनाची लागा झाल्याचं स्पष्ट होत असेल तर त्याचा आधीचा रिपोर्ट चुकीचा असू शकतो. कारण अँटीबॉडीज काही दिवसांपर्यंत शरीरात राहतात ज्यामुळे तुम्हाला परत कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असते, असंही काही डॉक्टरांचं म्हणणं आहे.

तुमचं वय जितकं कमी असेल तितक्या जास्त अँटीबॉडीज तुमच्या शरीरात तयार होतात. ज्याला आपण रोगप्रतिकारक क्षमता म्हणतो. वृद्ध व्यक्तीच्या तुलनेत तरुणांच्या शरीरात सर्वात जास्त अँटीबॉडीज तयार होतात. म्हणून कोरोनाचा सर्वाधिक धोका वृद्ध व्यक्तींना असं सांगण्यात येतंय.

एखादा व्यक्ती कोरोनातून बरा झाल्यानंतर त्याच्या शरीरात अँटीबॉडीज टिकून राहतात आणि रोगाचा सामना करतात. मात्र आतापर्यंत जगभरातील तब्बल १५ टक्के लोकांना एकदा बरे होऊनही परत कोरोनाची लागण झाल्याची गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे हा डॉक्टरांसाठी आणि वैज्ञानिकांसाठी चिंतेचा विषय आहे.

after 7 to 10 days antibodies are generated in human body but what are chances of getting corona for second time 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil Fact Check : 'भाकरी करपली नाहीच' आयपीएस विश्वास नांगरे पाटलांनी कविता लिहली की नाही?, महाराष्ट्र सरकारकडून फॅक्ट चेक

INDIA SQUAD VS AFGHANISTAN: भारताच्या संघात गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन... वन डेत ४, तर कसोटीत ७ खेळाडू

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

SCROLL FOR NEXT