Jitendra-Awhad 
मुंबई

हाजीकासममधील सदनिकांच्या वादावर जितेंद्र आव्हाड म्हणाले...

हाजीकासममध्ये सदनिकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांना विचारुन केला होता

रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: टाटा कॅन्सर रुग्णालयाला (tata cancer hospital) ‘म्हाडा’च्या १०० सदनिका देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल स्थगिती दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जातं होत. कारण कॅन्सरग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सदनिका देणं हा राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. विशेष म्हणजे पक्षाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या हस्तेच टाटा कॅन्सर रुग्णालयाला या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. (After cm uddhav thackeray permission we allot mhada rooms to tata cancer hospital jitendra awhad)

शिवेसना-राष्ट्रवादीमध्ये सुप्त संघर्ष सुरु झाल्याची चर्चा सुरु असतानाच आता या सदनिकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात आला आहे. स्वत: मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली. "आज कॅबिनेटच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला बोलवून घेतलं व त्याच परिसरात दुसऱ्या जागा शोधायला सांगितल्या. आमच्याकडे बॉम्बडाईंगच्या जागेमध्ये २२ इमारती आहेत. तिथे टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या सदनिका उपलब्ध करुन देण्यात येतील. महत्त्वाच म्हणजे या सर्व खोल्या एकत्र आहेत" अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

टाटा रुग्णालयात कॅन्सर उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना लालबागच्या हाजीकासममध्ये १०० सदनिका देण्यात आल्या होत्या. पण स्थानिकांनी त्यावर आक्षेप घेतला होता. "शिवसेना आणि राष्ट्रवादीत कोणताही दुरावा नाही. स्थानिक आमदारांच्या आक्षेपामुळे हा निर्णय घेतला" असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

"आज मी त्यांना भेटलो. १५ मिनिटात निर्णय झाला. विसंवाद असता तर २४ तासात निर्णय झाला नसता. आता त्याचा परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी जागा उपलब्ध झाली आहे" असे आव्हाड म्हणाले. "हाजीकासममधील आता त्या जागा राखीव ठेवणार आहोत. तिथे बीडीची चाळीतील रहिवाशांना तिथे आणू शकतो" असे आव्हाड म्हणाले. "टाटा कॅन्सर रुग्णालयाला हाजीकासमध्ये म्हाडाच्या सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना विचारुनच घेतला होता. फाईलवर त्यांची स्वाक्षरी होती. मी कुठलही काम विनापरवानगी करत नाही" असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT