ठाणे, ता. 28 : कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाही ठाण्यातील एका नागरिकाला पंतप्रधान कार्यालयाकडून सुखद अनुभव आला आहे. हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही पोस्टात केलेली गुंतवणूक मिळत नसल्याने ठाण्यातील धनंजय कुलकर्णी यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) दाद मागितली होती. अन, पुढील काही तासातच तक्रारीची दखल घेतल्याने पोस्टातील गुंतवणुकीचा धनादेश हातात पडला. लॉकडाऊनमध्येही सजगता दाखवणाऱ्या पीएमओ आणि भारतीय पोस्ट खात्याचे त्यांनी धन्यवाद मानले आहेत.
ठाण्यातील तीन हात नाका, दत्तनगर परिसरात राहणारे धनंजय कुलकर्णी यांनी पोस्टाच्या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (एनएससी) मध्ये काही गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक मार्च-एप्रिलमध्ये हातात येईल अशा पद्धतीने नियोजन केले होते. पण,दुर्दैवाने मार्च महिन्यातच देशभरात संचारबंदी जारी करण्यात आली. त्यामुळे त्यांना रक्कम मिळत नव्हती. दरम्यान, बँकेचे हप्ते तसेच, इतर गोष्टींसाठी पैशाचे तगादे सुरू झाले. आत्तापर्यंत कुलकर्णी यांचे सर्व हप्ते वेळेवर जात होते. महिनाभर प्रयत्न करूनही काहीच उपयोग होत नसल्यामुळे अखेर त्यांनी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला.
15 एप्रिल रोजी पीएमओकडे तक्रार नोंदविल्यानंतर अवघ्या तीन तासात मुंबईच्या जीपीओ कार्यालयातून कुलकर्णी यांना फोन आला. त्यांनी गुंतवणूक कुठल्या टपाल कार्यालयात केली आहे याबाबत विचारणा केली. सर्व माहिती दिल्यावर दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीस नाव विचारले, पण त्या व्यक्तीने त्यांना नाव न सांगता समस्या सुटणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्याचदिवशी सायंकाळच्या सुमारास गोखले रोड येथील टपाल कार्यालयातून कुलकर्णी यांना फोन आला. त्यांच्याकडुन गुंतवणुकीची तपशिलवार माहिती घेतली.
दुसऱ्या दिवशी गोखले रोड येथील टपाल कार्यालयात एनएससी सर्टिफिकेट घेऊन कार्यालयात येऊ शकाल का ? अशी विचारणा केल्याने, लागलीच कुलकर्णी टपाल कार्यालयात गेले. टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही या गोष्टीची कल्पना होती. अगदी थोड्याच वेळात गुंतवणूक केलेल्या रकमेचा धनादेश कर्मचाऱ्यांनी कुलकर्णी यांच्या हातात दिला.
after complaining to PMO citizen of pune gets his money cheque from post
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.