मुंबई : आमदार आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज सकाळी ED ने छापेमारी केली. या छापेमारीनंतर आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांना ED ने चौकशीसाठी ED कार्यालयात नेलं होतं. तब्बल पाच तासांच्या चौकशीनंतर ED कार्यालयातून विहंग सरनाईक याना सोडण्यात आलं आहे.
ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे घर व कार्यालयासह सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आज (मंगळवारी) 10 ठिकाणी छापे टाकले. मनी लाँडरिंगप्रकरणी मुंबई ठाण्यातील विविध ठिकाणी शोध मोहिम राबवण्यात आली. टॉप्स ग्रुपचे प्रमोटर संबंधीत ही शोधमोहिम राबवण्यात आली असून संबंधीत ठिकाणं रायकीय व्यक्तींशी संबंधीत असल्याचे ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मुंबई आणि ठाण्यातील 10 ठिकाणी ही शोधमोहिम राबवण्यात आली. ईडीच्या दिल्ली व मुंबई पथकाने ही कारवाई केली. त्याअंतर्गत मंगळवारी सकाळपासूनच शोध मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. ठाण्यासह मुंबईतील वांद्रे आणि पवई याठिकाणीही शोध मोहिम राबवण्यात आली.
सरनाईक कुटुंबिय आणि टॉप्स ग्रुप यांच्या संबंधांबाबत तपासणीसाठी ही शोध मोहिम राबवण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यावर नंदा यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. सरनाईक कुटुंब आपले जूने परिचीत आहेत. पण सरनाईक यांनी आपल्या कंपनी अथवा व्यवसायात एक पैसाही गुंतवलेला नाही. सरनाईक आणि शिवसेनेचे टॉप्स ग्रुपशी काहीही संबंध नसल्याचेही यावेळी नंदा यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, 2009 मध्ये ईडीने युकेतील व्यवहाराबाबत आम्हाला यापूर्वी विचारणा केली होती. त्यावेळी कागदोपत्री पुराव्यांसह व्यवहार पुर्णपणे कायदेशिर असल्याचे दाखवून देण्यात आले होते.
तसेच मॉरिशिअस येथील ट्रस्टबाबतही यापूर्वी विचारण्यात आले होते. ती ट्रस्टही वकीलांच्या मदतीने पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने स्थापन करण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. तसेच त्या ट्रस्टमध्ये एकही पैसा नसल्याचेही त्यावेळी ईडीला स्पष्ट करण्यात आले होते. टॉप्सच्याच काही पदाधिकाऱ्यांनी ईडीला चुकीची माहिती दिली असल्याचेही नंदा यांनी यावेळी स्पष्ट केले. ईडीकडून मात्र याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. फक्त मनी लाँडरीगप्रकरणी ही शोध मोहिम राबवली जात असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.
यापूर्वी रमेश नायर यांच्या तक्रारीवरून यलो गेट पोलिस ठाण्यात राहुल नंदा यांच्यासह आठ जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 175 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरण नुकतेच तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले आहे. त्यातही मॉरेशिअस येथील ट्रस्टबद्दल नायर यांनी आरोपी केला होता.
( संपादन : सुमित बागुल )
after five hours of enquiry vihang sarnaik comes out of ED office no reaction to media
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.