मुंबई

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर आमचं समाधान; 'शिर्डी'बंद मागे  

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईमध्ये सह्याद्री शासकीय अतिथीगृहावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिर्डीकरांची अत्यंत महत्वाची बैठक होतेय. साईबाबांच्या जन्मस्थळ वादावर मुख्यामंत्र्यांनी आज शिर्डीकरांची महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीला शिर्डीकरांच्या शिष्टमंडळासोबत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि अन्य महत्त्वाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गेले काही दिवस शिर्डीकर आणि  पाथरीकर आमने सामने आलेले पाहायला मिळतायत. दरम्यान मुंबईत सह्याद्रीवर पार पडलेल्या बैठकीत पाथरीकरांना बोलावण्यात आलेलं नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात, कदाचित उद्या किंवा परवा  मुख्यमंत्री पाथरीकरांसोबत संवाद साधणार का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. 

दरम्यान सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी बंदचं देखील आवाहन करण्यात आलं होतं. शिर्डीकरांच्या या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत. तर दुसरीकडे पाथरी ग्रामस्थांनी साईबाबांच्या जन्माशी निगडित 29 पुरावे पुरावे तयार ठेवलेत.  

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर आमचं समाधान; 'शिर्डी'बंद मागे  

या बैठकीत भाजपनेते राधाकृष्ण विखेपाटील उपस्थित होते. बैठकीनंतर बाहेर पडल्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये शिर्डी ग्रामस्थांची भूमिका आम्ही मांडली असल्याचं त्यांनी म्हटलंय, त्यानंतर शिर्डीग्रामस्थांचं समाधान झालंय असं देखील राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत. तीर्थक्षेत्र विकासाला आमचा कोणताही विरोध नसल्याचं देखील ते म्हणालेत, याचसोबत मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.

याबाबत बोलत असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री स्वतः याविषयी माहिती देणार असल्याचं सांगितलंय. अशात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय प्रतिक्रिया देतात आणि काय तोडगा काढतात, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. 

after meeting with cm uddhav thackeray we are happy and shirdi bandh rolls back says radhakrushna vikhe patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT