मुंबई

मुंबईत येत्या काही दिवसात किती तापमान उतरणार, वाचा..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उत्तर भारतातील शीतलहरीचा प्रभाव मुंबईवर जाणवण्यास सुरुवात झाली असून, किमान तापमान 15 अंशांपर्यंत खाली घसरले आहे. पुढील 48 तासांत तापमानात आणखी घट होऊन तापमान सरासरी 14 अंशांच्या खाली येण्याची शक्‍यता आहे. थंडीच्या आगमनामुळे घामाघूम मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

बुधवारी सांताक्रूझ येथे किमान तापमान 15 अंश; तर किमान तापमान 17 अंश नोंदवण्यात आले. नवी मुंबईत 11.03 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. मुंबईत सर्वांत कमी तापमान बोरिवली पूर्वेकडे 14.77 इतके नोंदवण्यात आले. मुंबईत नोव्हेंबरच्या मध्यापासून थंडीचे आगमन होण्यास सुरुवात होते; मात्र यंदा अरबी समुद्रातील वादळे आणि त्यानंतरचे ढगाळ वातावरण यामुळे थंडी लांबली होती.

यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिने दशकातील सर्वांत उष्ण महिने ठरले होते; मात्र 31 डिसेंबरच्या सकाळपासूनच मुंबईतील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. सांताक्रूझ येथे मंगळवारी किमान तापमान 17 अंश नोंदवण्यात आले होते; तर बुधवारी 15 अंशांपर्यंत नोंदवण्यात आले. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही घट झाली आहे.

सांताक्रूझ येथे बुधवारी 29.8 अंश आणि कुलाबा येथे 28.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे; तर पुढील दोन दिवस मुंबईत कमाल तापमान 28 अंश आणि किमान तापमान 14 अंशपर्यंत राहील असा अंदाज आहे. तापमानात घट झाल्याने अनेक मुंबईकरांनी सकाळच्या थंडीत व्यायामासाठी घराबाहेर पडण्यास पसंती दिली आहे. 

WebTitle : after one month delay finally winter is approaching mumbai and suburbs

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT