खारघर : तीन दिवसांपासून रस्त्यावर पडून असलेला कैदी छोटू. 
मुंबई

कोरोनाचा परिणाम : आजारी कैदी कारागृहातून थेट रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा

खारघर (बातमीदार) : आजारी अवस्थेत तळोजा कारागृहातून सोडण्यात आलेल्या एका कैद्याची संचारबंदीमुळे अन्नपाणी आणि औषधोपचारविना हाल होत आहे. तीन दिवसांपासून रस्त्यालगत असलेल्या एका मांडवाखाली पडून असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. 'सकाळ'ने कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताच कर्मचारी पाठवून योग्य ती उपाययोजना केली जाईल, असे सांगितले. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय आणि सुरक्षेच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने सात वर्षांपेक्षा कमी आणि किरकोळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांस टप्पाटप्प्याने सोडण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, तळोजा कारागृहातून 300हून अधिक कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यातील एक कैदी ओवे गाव आणि टाटा हॉस्पिटल समोरील चौफुली रस्त्यालगत एका मांडवाखाली अन्न आणि औषधाविना तीन दिवसांपासून झोपलेल्या अवस्थेत आहे. या संदर्भात खारघर पोलिस आणि पनवेल पालिका प्रशासनास माहिती देऊनही कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही.

छोटू शंकर यादव (वय अंदाजे 50, रा. झारखंड) याला वरळी मुंबई येथे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक करून आर्थर रोड कारागृहात रवाना केले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी आर्थर रोड कारागृह प्रशासनाने तळोजा मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी केली. तीन दिवसांपूर्वीच छोटूची सुटका करण्यात आली; मात्र बाहेर सुरू असलेल्या संचारबंदीमुळे बस, रेल्वे आणि वडापाव स्टॉल बंद असल्यामुळे आणि खिशात उपचारासाठी पैसे नसल्याने त्याला रस्त्यालगत अन्न आणि औषधविना आजारी अवस्थेत पडून राहावे लागत आहे. कारागृह प्रशासनाने लक्ष देऊन अशा कैद्यांची नातेवाइकांकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

कर्मचारी पाठवून संबंधित कैद्याला ताब्यात घेणार आहोत. त्याला रुग्णवाहिकेद्वारे वरळी येथे त्याचे नातेवाईक अथवा सहकाऱ्यांच्या स्वाधीन केले जाईल. 
- कौस्तुभ कुरलेकर, कारागृह प्रशासन अधिकारी, तळोजा मध्यवर्ती कारागृह 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax: 1 एप्रिलपासून नवा Income Tax नियम! पगार, घर-गाडी, गिफ्ट, PF वर आता आकारला जाणार कर; जाणून घ्या 7 मोठे बदल

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

SCROLL FOR NEXT