केईएम रुग्णालयातही मृतदेहांशेजारी रुग्णांवर उपचार, व्हिडीओ व्हायरल... 
मुंबई

धक्कादायक..! केईएम रुग्णालयातही मृतदेहांशेजारी रुग्णांवर उपचार, व्हिडिओ व्हायरल...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना वॉर्डमधील मृतदेहांबाबत तज्ज्ञांच्या समितीने नियमावली बनवून अनेक निर्णय घेतले असले, तरी केईएम रुग्णालय प्रशासनाला जाग आल्याचे दिसत नाही. सायन आणि कूपर रुग्णालयांनंतर केईएम रुग्णालयातदेखील कोरोना वॉर्डमध्ये मृतदेह पडून असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहांच्या आसपास इतर रुग्ण उपचार घेत असून डॉक्‍टर, नर्स आणि नातेवाईकांची ये-जा सुरू असल्याचेही दिसते. केईएममध्ये असे प्रकार वारंवार घडत असल्याने नवनियुक्त आयुक्त या प्रकरणावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दोनच दिवसांपूर्वी सायन रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये प्लास्टिक आवरणात लपेटलेल्या मृतदेहाचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तेथील अधिष्ठात्याची तडकाफडकी बदली झाली; मात्र त्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने काही धडा घेतल्याचे दिसत नाही. केईएम कोरोना वॉर्ड 20 (ए) मध्येही मृतदेह काळ्या प्लास्टिक कागदात लपेटलेले स्ट्रेचरवर पडून असल्याचे समोर आले आहे. तसेच मृतदेहांच्या शेजारीच इतर रुग्णांच्या खाटा भरलेल्या असल्यामुळे अनेक रुग्ण जमिनीवर झोपलेले दिसत आहेत; तर काहींना जमिनीवर झोपण्यासाठीही जागा नाही; मात्र स्ट्रेचरवर असे मृतदेह पडून असतानाही डॉक्‍टर, नर्स आणि रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात वावरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने कोरोना वॉर्डमधील विदारक स्थिती समोर आली आहे. 

सध्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात डॉक्‍टर, नर्स आणि अन्य आरोग्य सेवकांना कोरोनाची बाधा होत आहे. यापूर्वी सायन, केईएम, कूपरसारख्या रुग्णालयांत असेच कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह पडून असल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर सायन रुग्णालयात मृतदेह पडून असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा प्रकार ताजा असताना केईएममध्येही मृतदेह आणि रुग्णांची हेळसांड सुरू आहे. 

नवीन आयुक्त कारवाई करणार का? 
नवीन महापालिका आयुक्त इक्‍बाल चहल आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर पाहिल्याच दिवशी हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे केईएम प्रशासनावर ते काय कारवाई करणार, असा सवाल विचारला जात आहे. या प्रकाराबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

या प्रकाराची माहिती मी मागवली आहे. व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली जाईल. हा प्रकार केईएम रुग्णालयातील असल्याचे स्पष्ट झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. 
- डॉ. रमेश भारमल, संचालक, मुख्य पालिका रुग्णालय समूह. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT