covid vaccine e-sakal
मुंबई

महत्त्वाचं निरीक्षण: लसीचे दोन डोस घ्या, मृत्यूचा धोका टळेल

आरोग्य विभागाचं महत्त्वाचं निरीक्षण

भाग्यश्री भुवड

मुंबई: राज्यात लसीकरण सुरू झाल्यापासून अनेकांना कोरोनाची बाधा झाली. तर, त्यातून बरे होऊनही अनेकांना पुन्हा कोरोनाची बाधा झाली. त्यात लस घेतलेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदवले आहे.

राज्यात 18 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली असून आतापर्यंत सव्वा दोन कोटीहून अधिक जणांनी लस टोचून घेतली आहे. यात मुंबईतील 28 लाख व्यक्तींचा समावेश असून वैद्यकीय कर्मचारी,  कर्मचारी आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. त्यापैकी 7 लाख 25 हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यावर 15 ते 20 दिवसांनी रोगप्रतिकार शक्ती वाढते तर दोन महिन्यात दुसरा डोस घेतल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते त्यामुळे पुन्हा कोरोना झाला तरी ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडत नाही. त्या रुग्णांना शक्यतो कोणतेही गंभीर स्वरूपाचा आजार होत नाही असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

एक डोस घेण्यापेक्षा 2 डोस घेतलेल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता नाही. तसेच, व्यक्तीला पुन्हा कोरोना झाला तर तो सहजपणे त्यावर मात करू शकतो त्यामुळे लसीकरण खूप गरजेचे असून प्रत्येकाने लस टोचून घ्यायला हवी

- डॉ. तात्याराव लहाने, संचालक वैद्यकी व वैद्यकीय शिक्षण व संशोधनालय

कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना मृत्यूचा धोका कमी -

दरम्यान, दोन डोस घेतल्यानंतर मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. मुंबईत अशा घटना घडल्या आहेत. पण, हे प्रमाण फारच कमी आहे. आयसीयूमध्ये जाण्याचे प्रमाण कमी असते. लस घेतल्यानंतर ही 15 ते 20 टक्के लोकांमध्ये ॲटीबॉडीज तयार होत नाहीत. त्यातून जर गंभीर प्रकारचा कोरोना झाला तर त्यातून मृत्यू होण्याची शक्यता असते. पण, प्रमाण कमी आहे. 

डॉ. अविनाश सुपे, सदस्य, कोविड टास्क फोर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

SCROLL FOR NEXT