मुंबई

हायकोर्टाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय; शिक्षा सुनावणीनंतर तडजोड झाली तरी शिक्षा रद्द नाही

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 26 : दोन गटांमध्ये झालेल्या मारामारीच्या प्रकरणात आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्यामध्ये तडजोड झाली तरी त्यामुळे शिक्षा रद्दबातल होऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील दोन गटामधील युवकांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका केल्या होत्या. आमच्यामध्ये सहमतीने तडजोड झाली आहे, त्यामुळे आम्हाला सुनावलेली शिक्षा रद्द करा, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती.

याचिकेवर न्या. टी व्ही नलावडे आणि न्या. एम जी सेवलीकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकादारांना दिलासा देण्यास नकार दिला. न्यायालयाने खटल्यात आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली असेल आणि त्यानंतर तडजोड झाली असेल तर ती शिक्षा रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. अपील याचिकेवर न्यायालय केवळ शिक्षा कमी करण्यावर निर्णय देऊ शकते, शिक्षा रद्द करण्यावर नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. दंडासह होणाऱ्या शिक्षेमध्ये असा बदल करता येत नाही, असे सांगण्यात आले आहे. 

मे 2009 मध्ये झालेल्या एका घटनेत दोन गटात मारामारी झाली होती. दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले. सर्व आरोपींविरोधात एकत्र खटला चालविण्यात आला. न्यायालयाने सर्वांना जमावबंदी, शांतता भंग करणे, हत्यारे बाळगणे, तणाव निर्माण करणे आदी आरोपात दोषी ठरवले आणि शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात त्यांनी अपील याचिका केली. मात्र दरम्यान त्यांनी आपसात तडजोड केली आणि शिक्षा रद्द करण्यासाठी अर्ज केला. मात्र कंधार न्यायालयाने अमान्य केला. त्यामुळे उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला.

न्यायालयाने याचिकादारांची मागणी अमान्य केली असली तरी याचिकादार शिक्षा कमी करण्यासाठी मागणी करु शकतात, असे स्पष्ट केले आहे. 

( संपादन - सुमित बागुल )

after verdict of court even after settlement sentence of court can not be revoked

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

SCROLL FOR NEXT