मुंबई

शिवसैनिक थेट उतरलेत रस्त्यावरल, मेट्रो 3 चं काम पाडलं बंद..

मिलिंद तांबे

मुंबई : मेट्रो 3 च्या रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कामामुळे गिरगावातील रहिवाशी अक्षरशः बेजार झाले आहेत.परिसरात सुरू असलेल्या मेट्रो 3 च्या त्रासदायक कामावरोधात शिवसेनेने दंड थोपटत आदोलनाचा इशारा दिला होता. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज डेब्रिजची ने आण करणारे डंपर फोडले तसेच डंपरमधील ड्रायव्हर आणि क्लिनर यांना  पळवून लावलं.

शिवसेनेनं मेट्रो तीन प्रकल्पा विरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू केलंय. आज गिरगावातील मेट्रो तीन प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या खोदकामांमुळे स्थानिक नागरिकांना जो त्रास होतेय त्या संदर्भात शिवसेनेने आंदोलन आक्रमक आंदोलन केले. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज त्रास होतोय, तसेच रहिवाशांना त्यांच्याच घरी येण्या-जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या विरोधात शिवसेनेनं हे आंदोल केलं.

मेट्रो 3 चं काम प्रगतीपथावर आहे. गिरगांवाजवळ मोठा बोगदा करण्यात आला असून याठिकाणी पोकलेनने ड्रीलिंगच काम सुरू आहे. या कामामुळे आसपासच्या परिसराला हादरे बसत असल्याचा रहीवाश्यांचा आरोप आहे. शिवाय डेब्रिज उचलण्याची डंपरची ये-जा सुरू असून त्याच्या आवाजाने ही रहिवाशी त्रासले आहेत.

अनेकदा तक्रारी करून देखील तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. यामुळे शिवसैनिकांनी थेट रस्त्यावर उतरत आक्रमक आंदोलन केले.

Webtitle : agitation against metro three work in goregaon by shivsena party workers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT