मुंबई

वारीस पठाण यांनी आपले शब्द घेतले मागे, माफी मात्र मागितली नाहीच...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - गुलबर्गामध्ये एका कार्यक्रमात, "१०० कोटींवर १५ कोटी मुस्लिम भारी पडू" असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशभरातून AIMIM चे मुंबई भायखळ्यातील माजी आमदार आणि नेते वारीस पठाण यांच्यावर कडाडून टीका करण्यात आली. त्यांना  देशभरातून मोठ्या रोषाचा सामना करावा लागला. यानंतर आपल्यावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो, या पार्श्वभूमीवर वारीस पठाण यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत आपण केलेलं विधान मागे घेत असल्याचं म्हटलंय.

वारीस पठाण यांनी आपलं विधान मागे जरी घेतलं असलं तरीही त्यांनी गुलबर्गा मधील सभेत केलेल्या विधानाचा पश्चाताप होतोय किंवा 'मी माफी मागतो' असं कोणतंही वक्तव्य पत्रकार परिषदेत केलेलं नाही. आमच्यासाठी हा विषय इथे संपला, माध्यमांनी हा विषय किती चालवायचा हे त्यांनी ठरवावं, असं AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. 

या पूर्वीही वारीस पठाण यांनी आपलं वक्तव्य चुकीचं नसल्याचं म्हटलं होतं, आता कडाडून टीका झाल्यानंतर वारीस पठाण यांनी आपले शब्द मागे घेतलेत. 

काय म्हणालेत वारीस पठाण ? 

"सर्वधर्म समभाव ही या देशाची खासियत आहे. आपल्यात आपापसात काही मुद्द्यांवर मतमतांतरं मतं असू शकतात आणि लोकशाहीत असं असायला असायलाही हवं. याचा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरायच्या संविधानाने दिलाय. मी पुन्हा एकदा स्पष्ट करी इच्छितो की मी असं कोणताही वक्तव्य केलेलं नाही, ज्याचा वेगळा अर्थ काढून मला निशाणा बनवलं जातंय. यामध्ये केवळ राजकीय षडयंत्रातून मला आणि माझ्या पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. तरीही माझ्या कुठल्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझं विधान मागे घेतो. मी या देशाचा एक सच्चा नागरिक आहे आणि मला मी भारतीय असल्याचा अभिमान आहे. जय हिंद," असं वारीस पठाण म्हणालेत.

वारीस पठाण यांनी मुंबईतील वांद्रे भागात पत्रकार परिषद घेत आपलं विधान मागे घेतलंय.  

AIMIM leader waris pathan takes his words back but did not apologies 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namo Tourism Centre Controversy : राज ठाकरेंचा 'नमो टुरिझम सेंटर' तोडण्याचा इशारा, शिंदे गटानं दिलं चोख प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले?

Inside Story Maharashtra Farmers : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची बंद दाराआड काय घडली चर्चा, राजू शेट्टींनी सांगितली इनसाईड स्टोरी...

Latest Marathi News Live Update : खोट्या मतदार यादीविरोधात ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

MPSC Result 2024: राज्यसेवा परीक्षा निकाल जाहीर! सोलापूरचा विजय लामकणे राज्यात पहिला

Suhas Shetty Case : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येमागे PFI चा कट उघड, NIA चा धक्कादायक अहवाल, 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

SCROLL FOR NEXT