मुंबई

मुंबईहून वाढत आहेत देशांतर्गत उड्डाणे! जाणून घ्या कारण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः देशांतर्गत हवाई प्रवास जास्त सुखकर आणि वेगाने करण्यास आता वेग दिला जात आहे. त्यामुळेच एअर इंडियाने देशांतर्गत विमान सेवेत वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईहून हैदराबाद, कोचीन, कोलकता, भोपाळ, राजकोट, तिरुपती, विशाखापट्टणमसाठीच्या विमानात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. 

मुंबई - हैदराबाद - मुंबई तसेच मुंबई - भोपाळ - मुंबई या मार्गांवर सोमवारी जास्त विमाने उपलब्ध असतील, तर मुंबई - कोलकता - मुंबई मार्गावरील विमानात सोमवारी, बुधवारी, शुक्रवारी तसेच रविवारी वाढ करण्यात आली आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी जास्त  मुंबई - राजकोट - मुंबई मार्गावर जास्त सेवा उपलब्ध असेल.  

मुंबई - कोचीन - मुंबई मार्गावरील अतिरीक्त फेऱ्या बुधवारी आणि शुक्रवारी असतील. त्यास 24 जूनपासून सुरुवात होणार आहे, मुंबई - तिरुपती - विशाखापट्टणम - मुंबई च्या अंतिरिक्त फेऱ्या 25 जूनपासून सुरवात होणार आहे. त्या तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी असणार आहेत. 

अतिरीक्त फेऱ्यांमध्ये आता दिल्लीहून बंगळूर, इंदूर, रांची, कोईंबतूरसाठी तसेच बंगळूर - चंडिगड, हैदराबाद - विशाखापट्टणम आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर मुंबई विमानतळावरुन एकंदर 50 विमानांच्या फेऱ्या सुरु झाल्या. 15 जूनपासून ही संख्या दुप्पट करण्यात आली, पण मात्र एअर इंडियाने आपल्या फेऱ्या वाढवण्यास उशिर केला. मुंबईतून प्रयाण केलेल्या तसेच आगमन झालेल्या विमानांची एकत्रित संख्या 16 जूनला 52 होती, त्यात वाढ होऊन तीच संख्या 23 जूनपर्यंत 92 वर गेली. एअर इंडियाप्रमाणेच इंडिगो, विस्तारा, स्पाईसजेट, गोएअर, एअर एशिया इंडिया - ट्रू जेट, अलायन्स एअर या विमान कंपन्या मुंबईतून उड्डाण तसेच आगमन सुरु केले आहे. प्रवाशांच्या मागणीमुळेच विमाने वाढत असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT