संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुंबई

हुश्श... कल्याण-डोंबिवलीचे प्रदूषण कमी झाले!

रवींद्र खरात

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत विविध कंपन्यांमधून सुटणारा धूर, वाहतूक कोंडी, डंपिंग ग्राऊंडवरील कचरा, त्याला लागणारी आग आदी प्रकारांमुळे दोन्ही शहरांत हवेची गुणवत्ता ढासळत चालली होती. प्रदूषणात सातत्याने होत असेलेली वाढ चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, कोरोना संक्रमणामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाले आणि अनपेक्षित घडले. एप्रिल महिन्यात पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात वायुप्रदूषण निर्देशांक कमी झाल्याने कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा मिळाला आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील कंपन्यांमधून सुटणारा धूर, वाहतूक कोंडीमुळे होणारे प्रदूषण आणि डंपिंग ग्राऊंडला आगी लागत असल्याने हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली होती. रहिवाशांमध्ये श्वसनविकाराच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. अनेक पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात सरकारी यंत्रणांविरोधात आवाजही उठवला. दरम्यान, लॉकडाऊन सुरू झाले आणि प्रदूषण कमी कमी होत गेले. सुरक्षेचा उपाय म्हणून शहरातील एमआयडीसी परिसरातील औद्योगिक कारखाने बंद झाली अन् रस्ता वाहतूकही थंडावली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. 

हृदयद्रावक! फुलेविक्रेत्यांचे आयुष्य कोमजले; दैनंदिन गरजांसाठीही पैसे नाहीत

एप्रिल महिन्यात पालिकेने कल्याण रेल्वे स्थानक, कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक, कल्याण पश्चिम रामबाग, आधारवाडी डंपिंग ग्राऊंड, कल्याण पश्चिम शहाड जकात नाका , डोंबिवली फडके रोड, आणि डोंबिवली पालिका विभागीय कार्यालय परिसरात एका खासगी एजन्सीमार्फत वायुप्रदूषणाबाबत मोजणी आणि सर्वेक्षण केले. लॉकडाऊनच्या काळात प्रदूषणाचा निर्देशांक कमी आल्याचे समोर आले आहे. धूलिकण, नायट्रोजन डायऑक्साईड, अमोनिया, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, ओझोन आदींची तपासणी केली जाते.

        असा आहे वायुप्रदूषण निर्देशांक
           
                                                 2019                एप्रिल 2020

  • कल्याण रेल्वेस्थानक परिसर             76.5                  40.35 
  • कल्याण आधारवाडी डंपिंग ग्राउंड     85.4                  38. 88
  • कल्याण शिवाजी चौक                     80.8                  39.59
  • शहाड जकात नाका                        74. 9                 41. 77 
  • कल्याण रामबाग                            67.1                  43.60
  • डोंबिवली पालिका                          84.1                  42.36
  • डोंबिवली फडके रोड                      66.1                  31. 60

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT