Airline delays 
मुंबई

Mumbai Rain Update: पावसाचा विमान सेवेला फटका, शाळांना सुट्टी जाहीर; मुंबईत 3-4 तासांत मुसळधार बरसण्याची शक्यता

Mumbai Airline Flights delays: लोकल आणि रेल्वे उशिराने धावत आहेत. याचा फटका विमान वाहतुकीला देखील बसला आहे. मुंबईहून इतर ठिकाणी जाणाऱ्या अनेक फ्लाईट रद्द करण्यात आल्यात किंवा त्यांची वेळ पुढे ढकलण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

Mumbai Rain: मुंबईमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकल आणि रेल्वे उशिराने धावत आहेत. याचा फटका विमान वाहतुकीला देखील बसला आहे. मुंबईहून इतर ठिकाणी जाणाऱ्या अनेक फ्लाईट रद्द करण्यात आल्यात किंवा त्यांची वेळ पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना देखील पावसाची झळ बसली आहे.

पावसाचा परिणाम एक्स्प्रेस रेल्वेवर देखील पडला आहे. डेक्कन क्विन, प्रगती, सिंहगड या पुण्यातून येणाऱ्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी बस स्टँडवर गर्दी केली आहे. याठिकाणी मुंबईला जाण्यासाठी लोकांनी रांग लावली आहे. मुंबईत सकाळी १ ते ७ वाजेपर्यंत ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईकरांना त्यामुळे पावसाचा त्रास सहन करावा लागणार आहे.

मुंबईतील सकाळच्या सत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळेत आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना परत पाठवण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. मुंबईकरांना देखील प्रशासनाकडून आव्हान करण्यात आले आहे. गरज नसेल तर बाहेर पडू नका असे आव्हान नागरिकांना करण्यात आले आहे.

मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे.

आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात येत आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT