Ajit Pawar esakal
मुंबई

अजित पवारांची हिजाब प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया म्हणाले काही लोक...

राष्ट्रवादीकडे जी खाती आहेत त्यातून विकास कसा साधता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून देशभरातील राजकीय वातावरण तापले असून याप्रकरणावर अनेक राजकीय नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणानंतर महाराष्ट्रासह देशभरात निदर्शने, आंदोलने करण्यात आली. दरम्यान, आता या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, समाजात फूट पडेल अशा घटना टाळल्या पाहिजेत असे सांगत, काही लोक यातून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैव आहे. भारतीय संस्कृती आणि संविधान आपल्याला जातीय आणि धार्मिक आधारावर लोकांना विभाजित करण्यास शिकवत नाही असे मत देखील अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असले तरी, प्रत्येक पक्ष स्वतःचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत आज काही जणांनी मुंबईत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. इतर पक्षातील लोक राष्ट्रवादीत येऊ पाहतात त्याची चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले. ज्यांच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत त्यांना आपण संधी देत असतो असे सांगत औरंगाबाद मराठवाड्याचे प्रवेशद्वार असल्याचे अजित पवार म्हणाले.

औरंगाबादमध्ये पदवीधर शिक्षक आमदार म्हणून राष्ट्रवादी निवडून येते, पण आमदार निवडून येत नाही ही खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र, यासाठी प्रयत्न केले तर, यश नक्की मिळेल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. जे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत, त्यांचे स्वागत आहे. गंगापूर, कुलतापूर येथील अनेक प्रश्न प्रलंबित असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले की, गंगापूर, कुलतापूर भागात पक्षातील प्रवेशाने निश्चित ताकद वाढली असून, राष्ट्रवादीकडे जी खाती आहेत त्यातून विकास कसा साधता याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. संघटना कशी मजबूत करायची हे पवार साहेब 60 वर्ष करत असल्याचे सांगत, ज्याच्यामध्ये नेतृत्व आहे त्यांना राष्ट्रवादी नेहमीच संधी देत असते असे देखील अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. दोन वर्षे कोरोना महामारीमुळे विकास थांबला असल्याचे सांगत, मोठ्या प्रमाणात महसूल बुडाल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT