Ajit pawar on Gopichand padalkar 
मुंबई

Ajit Pawar News: "उपटसुंभ... त्याला मी" ; अजित पवार भर पत्रकार परिषदेत संतापले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

तसेच गोपीचंद पडळर यांच्याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार चांगलेच संतापले. पहिल्यांदा त्यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. (Ajit pawar on Gopichand padalkar)

अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. गोपीचंद पडळकर अजित पवारांवर थेट टीका करत असतात.

बारामतीचे चुलते, पुतणे चोरटे आहेत, दिवसा दरोडे टाकतात. शरद पवार यांनी ५० वर्ष राज्य केलं पण विकास केला नाहगी. ते जाणता राजा नाही तर नेमता राजा आहेच. काका पुतण्याची एकच टोळी राज्यात आहे, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी काल नाशिक येथे बोलताना केली होती. यावर अजित पवार यांनी प्रश्न विचारण्यात आला. 

अजित पवार म्हणाले,  "अशा उपटसुंभ लोकांना उत्तरे द्यायला मी बांधील नाही. त्या (गोपीचंद पडळकर) व्यक्तिच्या संदर्भात मी उत्तर द्यायला मी बांधील नाही. त्याने कोणताही प्रश्न उपस्थित केला तर तो काही ऐवढा मोठा नेता लागून गेला नाही. त्याचे डिपॉझिट जप्त करुन त्याला परत पाठवले आहे."

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. यावर अजित पवार म्हणाले, "राजकीय विरोधक आहेत म्हणून कोणी संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर राष्ट्रवादी सहन करणार नाही."

"सरकार मुळ विषयावरुन लक्ष हटवण्यासाठी नको तो वाद उकरून काढत आहे. राजकीय सूडापोटी कारवाई करणे चुकीचे आहे. सत्ताधारी पक्ष वेगळ वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. महागाई आणि बेरोजगारी वरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे," असा आरोप अजित पवार यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र; महाराष्ट्रातील थंडी कमी होणार? राज्यात पावसाची शक्यता

प्रेयसीने साथ सोडली, त्याने जिद्द सोडली नाही! ७ वर्षांच्या संघर्षानंतर UPSC मध्ये मिळवला २३८ वा क्रमांक, कोण आहे आयुष कृष्णा?

Amravati News: मोर्शी नगरपरिषदेच्या गच्चीवर पार्टी, समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल, जिल्ह्यात खळबळ

Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल अधिक गडद; धुळ्यात पारा १०.४ अंशांवर, तर रत्नागिरीत तापमानाने गाठला ३६.१ अंशांचा टप्पा

IND vs NZ, 5th ODI: विदर्भाच्या खेळाडूचं पदार्पण, सिराजलाही संधी, मग Playing XI मधून कोण झालं बाहेर? भारताला मालिका विजयाची संधी

SCROLL FOR NEXT