File Photo 
मुंबई

नाशिक पोलिसांच्या मदतीला अक्षयची धाव

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना महामारीच्या संकटाशी लढण्यात डॉक्टर, परिचारिका आणि पोलिस आघाडीवर आहेत. दिवसरात्र अनेक लोकांच्या संपर्कात येणाऱ्या पोलिसांना कोरोनाची बाधा होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे अभिनेता अक्षय कुमार याने तापमान, रक्तदाब मोजणारे 1000 सेन्सर बँड मुंबई पोलिसांना दिले होते. आता त्याने नाशिक पोलिसांना 500 सेन्सर बँडची भेट दिली आहे.

सेन्सर बँड वापरणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान, हृदयाचे ठोके, रक्तदाब, झोप, चाललेले अंतर आणि खर्च झालेल्या कॅलरी अशी माहिती नोंदवली जाते. त्यामुळे कोरोनाची लागण झाली आहे का, हे समजण्यास मदत होते. सध्या कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईत पोलिस फ्रंटलाईनवर आहेत. नागरिकांसाठी आपल्या जिवाची बाजी लावणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेला मदत म्हणून अक्षय कुमारने सेन्सर बँडची भेट दिली आहे.

नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी अक्षय कुमारचे या मदतीबद्दल आभार मानले आहेत. ’’अक्षय कुमारने दिलेल्या सेन्सर बँडचा उपयोग ४५ वर्षांवरील पोलिस कर्मचाऱ्यांना होईल. त्यांच्या शरीराचे तापमान, रक्तदाब असा डेटा नोंदवता येणार आहे’’, असे नांगरे-पाटील म्हणाले.

अक्षय कुमारने पंतप्रधान सहायता निधीला २५ कोटी रुपये दिले होते. त्याने थिएटर मालक आणि कलाकारांनाही मदत केली होती. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली आहे.

Akshay Kumar helps Nashik police

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT