File Photo 
मुंबई

आर्थिक मंदीतही मद्यविक्री "झिंगाट'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशात आर्थिक मंदी असतानाही राज्यातील मद्यविक्री "झिंगाट' असल्याचे दिसते. एप्रिल 2019 ते डिसेंबर 2019 दरम्यान मद्यविक्रीतून 1283 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला असून, हा आकडा मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे सहा कोटींनी जास्त आहे.

देशातील आर्थिक मंदीमुळे रोजगारांना कात्री लागली असून, महागाई वाढल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे, परंतु मद्यप्रेमींवर फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी लक्षात घेतल्यास मद्यविक्रीत वाढच झाल्याचे आढळते. देशी दारू, बिअर, भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तिजोरीत मोठी भर पडत आहे.

नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्रीच्या विरोधात विशेष मोहीम राबवली होती. त्यामुळे अधिकृत मद्य दुकानांमधून होणाऱ्या विक्रीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

मद्यविक्रीतून तिजोरीत भर 
वर्ष    महसूल 
(कोटी रुपये)    देशी 
(लाख बल्क लि)    विदेशी 
(लाख बल्क लि)    बीयर 
(लाख बल्क लि)    वाईन 
(लाख बल्क लि)
२०१५-१६    १२४६९.८४    ३१६३.०६    १८६३.८१    ३२८४.०३    ५९.२१
२०१६-१७    १२२८७.९०    ३२५६.९९    १९२३.५६    ३२४८.४३    ६४.६२
२०१७-१८    १३४४९.६५    ३१२८.०५    १७९२.३७    २७६०.३८    ६०.५६
२०१८-१९    १५३२२.७८    ३५०४.२०    २०७७.१६    २९८८.३६    ७३.९५
एप्रिल-डिसे. २०१९ ११५५४.७५  २७१३.६७    १६२३.९६     २३४२.३८ ५४.१० 

लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या काळात अवैध मद्यविक्रीवर कारवाई केली होती. राज्याच्या सीमा भागातही बनावट विदेशी मद्य, हातभट्टीची वाहतूक व विक्रीवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता अधिकृत दुकानातूनच मद्यविक्री होत असल्याने एप्रिल ते डिसेंबर 2019 या नऊ महिन्यांत महसुलात 10 टक्के वाढ झाली आहे. 
- प्राजक्ता वर्मा लवंगारे,
आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क

Alcohol sales rise even in economic recession

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT