local train 
मुंबई

किमान 'यांना' तरी लोकल प्रवासाची मुभा द्या; संघटनेची मागणी

सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी

विराज भागवत
  • सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी

मुंबई: दहावी-बारावीचे निकाल (SSC HSC Results) आणि त्याच्या सर्व प्रक्रिया (Procedure) करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून (School Management) लवकरच शिक्षकांना त्यांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात (Colleges) बोलावले जाणार आहे. मुंबईत (Mumbai) असलेल्या सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांतील बहुतांश शिक्षक हे मुंबईबाहेर (Out of Mumbai) राहतात. त्यामुळे अशा बाहेरून येणाऱ्या शिक्षकांना तरी लोकल (Local Trains) प्रवासासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेसह महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेने केली आहे. (Allow Local Train Journey to the Teachers who are coming to schools from outside of Mumbai)

मागील काही दिवसांपूर्वी सरकारने राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीचा निकाल शाळा स्तरावर तयार करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. या निकालाचे काम अत्यंत महत्त्व आहे. हा निकाल वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच 14 जूनपासून शालेय कामकाज सुद्धा सुरु होत आहे. त्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शाळेत उपस्थित राहणे आवश्यक होणार आहे. तसेच माध्यमिक शालांत परीक्षा बोर्ड, शिक्षणाधिकारी कार्यालय यासोबत शाळेशी निगडीत अन्य कार्यालयांमध्ये अत्यावश्यक कामासाठी जावे लागते. त्यामुळे या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना लोकल प्रवासासाठी परवानगी दिली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मुंबईतील 70 मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी हे पालघर, वसई, विरार, अंबरनाथ, कल्याण, कर्जत, कसारा, नवी मुंबई आणि पनवेल अशा दूरच्या ठिकाणी राहतात. यामध्ये महिला शिक्षकांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना खाजगी प्रवास करण्याची कोणतीही सोय त्यांच्या वेळेत नाही, त्यामुळे लोकलने प्रवास करण्याची परवानगी तातडीने देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT