Culprit Arrested sakal media
मुंबई

गळा आवळून चेहरा जाळलेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा; पतीला ठोकल्या बेड्या

दिनेश गोगी

उल्हासनगर : मागच्या महिन्याच्या 22 तारखेला अंबरनाथ (Ambarnath) शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गळा आवळून चेहरा जाळून टाकलेल्या महिलेच्या हत्येचा (woman murder) उलगडा झाला आहे. उल्हासनगर (ulhasnagar) गुन्हे अन्वेषण शाखेच्या (CID) पोलिसांनी हे डिटेक्शन करताना चारित्र्याच्या संशयावरून हत्या करणाऱ्या पतीला (Culprit Arrested) बेड्या ठोकल्या आहेत.

गायकवाड पाड्यातील भागूबाई चिकणकर यांच्या भाड्याच्या खोलीतून 22 ऑगस्ट रोजी असह्य दुर्गंधी येत होती.शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता खोलीत एका महिलेचा चेहरा जाळून टाकलेला मृतदेह मिळून आला होता.शवविच्छेदन अहवालात सदर महिलेचा गळा आवळून तिचा चेहरा जाळण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. सदर महिला ही 25 वर्षीय सुशिला साहेबराव निकाळजे उर्फ काजल असून तिच्या सोबत काही दिवसांपूर्वीच लग्न करणाऱ्या सुरज खरात याने चारित्र्याच्या संशयावरून तिचा खून केल्याची माहिती तपासात समोर येऊ लागली.

सुरजला शोधण्यासाठी तरडे यांनी पोलीस निरीक्षक मनोहर पाटील,सहायक पोलीस निरीक्षक संपत फटोळ,उपनिरीक्षक किशोर महाशब्दे,सहायक पोलीस उपनिरीक्षक शाम रसाळ,सुरेंद्र पवार,संजय माळी,हवालदार महेश पाटील,विश्वास माने,विकास करणे ही टीम तयार करून आजूबाजूचे शहरे पिंजून काढली.काल 3 तारखेला सूरज हा बदलापूरातील कामगार नाक्यावर येणार असल्याची माहिती मिळताच उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

सुशिलाचे वागणे बोलणे संशयास्पद वाटत होते.तिचे चारित्र्य चरित्रहीन जाणवत होते.22 तारखेला तिच्याशी यावरून वादविवाद झाल्यावर तिचा गळा आवळून तिला ठार मारले आणि चेहरा जाळून दरवाजाला कुलूप लावून पळ काढल्याची कबूली आरोपी सूरज याने दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT