मुंबई

काय सांगता.. रुग्णवाहिकेतून होतेय चक्क डिझेलची वाहतूक; वाचा कुठे घडलाय हा प्रकार...

विजय गायकवाड

नालासोपारा : मुंबईपरिसरातील इतर महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. अनेक रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाही, तर काही रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याने प्रसंगी रुग्ण दगावण्याचेही प्रकार समोर आले आहे. काही ठिकाणी रुग्णवाहिका मिळत नसल्याने स्वयंसेवी संस्थांकडून, राजकीय नेत्यांकडून रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मात्र, रुग्णवाहिकांचा वापर रुग्णांची ने-आण करण्याएवजी चक्क डिझेलची वाहतूक करण्यासाठी केल्याचा प्रकार वसईत उघडकीस आला.

एकीकडे वसई-विरार शहरात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यात येथे रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसल्याची बोंब उठत असताना, काल वसईच्या पेट्रोलपंपावर चक्क पालिकेच्या रुग्णवाहिकेतून डिझेल घेवून जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वसईच्या माणिकपूर येथील एका पेट्रोल पंपावर दुपारी साडेचारच्या सुमारास वसई विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णवाहिकेच्या आत असलेल्या प्लास्टिकच्या बॅरलमध्ये चक्क डिझेल भरलं जात होतं. 

वास्तविक कोरोनाच्या या काळावधीत वाढत्या रुग्णांमुळे रुग्णांना रुग्णवाहिका कमी पडत आहेत. रुग्णवाहिकेसाठी रुग्णांना तासनंतास ताटकळत बसावं लागते.  रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांचा जीव ही गेल्याच्या घटना घडल्या आहेत.  तसेच याच महिन्याच्या सुरुवातीला पालिकेने प्रत्येक प्रभागाला 1 अशा 9 पिकअप जीप नव्याने घेतल्या आहेत. असे असताना महापालिका डिझेलची वाहतूक करण्यासाठी रुग्णावाहिकेचा वापर करत असल्याने सामान्य नागरिकांमधून पालिकेविरोधात चिड निर्माण होत आहे. 

रुग्णवाहिकेतून डिझेलची वाहतूक कोणी करायला लावली. त्यासाठी पालिकेकडे अन्य वाहन असतानाही रुग्णवाहिकेचा वापर डिझेल आणण्यासाठी का केला याची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी केली आहे. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही..
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT